अहिल्यानगर : सिद्धटेक येथील गणपती मंदिराजवळचे वादग्रस्त बांधकाम सकल हिंदू समाजाकडून जमीनदोस्त
हिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायकपैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक येथे गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनाधिकृत थडगे उभारण्यात आले होते.

योद्धा एक्सप्रेस न्युज कर्जत:अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायकपैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक येथे गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अनाधिकृत थडगे उभारण्यात आले होते. काल अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप व श्रीराम प्रतिष्ठान या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सागर बेग यांच्या उपस्थितीमध्ये सकल हिंदू संघटनेच्या युवकांनी हे वादग्रस्त थडगे जमीनदोस्त केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आले. प्रचंड मोठ्या संख्येने युवक यावेळी उपस्थित होते. मोठा पोलीस बंदोबस्तदेखील यावेळी ठेवण्यात आला होता.कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिराच्या महाप्रवेशद्वाराच्या जवळच अनाधिकृत थडगे बांधण्यात आले होते. या थडग्याला कोणताही कायद्याचा आधार न घेता काही लोक प्रशासनाला वेठीस धरत होते. या बेकायदेशीर थडग्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या जात आहे. यामुळे ते तात्काळ त्या ठिकाणाहून हटवावे अशी मागणी सकल हिंदू समाज कर्जत तालुका यांच्या वतीने जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन यांच्याकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली होती. मागणी करूनही प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्यामुळे अखेर काल १६ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता आमदार संग्राम जगताप व सागर बेग हे सिद्धटेक येथे या वादग्रस्त थडगे असलेल्या ठिकाणी भेट देणार होते. यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता.संग्राम जगताप यांची सर्वप्रथम कर्जत शहरांमधून भव्य रॅली काढण्यात आली.
यानंतर ग्रामदैवत गोदड महाराज यांचे दर्शन घेऊन ही रॅली थेट सिद्धटेक येथे पोहोचली. त्या ठिकाणी पोहोचल्यावर युवकांनी ते वादग्रस्त थडगे स्वतःच पाडून टाकले. या ठिकाणी असणारे काठ्या व इतर साहित्याच्या मदतीने थडगे व त्यावरील पत्रे ,भिंती या नष्ट करण्यात आल्या. आणि ते जमीनदोस्त करण्यात आले .यावेळी आमदार संग्राम जगताप व सागर बेग हे उपस्थित होते. यावेळी युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर कर्जत येथील कापरेवाडी वेस येथे असणाऱ्या मारुती मंदिराच्या ठिकाणी महाआरती करण्यात आली.
प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील
बारामतीत भीमपुत्र आयडॉल सन्मानाचे आयोजन
संविधान विचार मंच आणि आरोग्यदान परिवार यांच्या वतीने बारामतीत राज्यस्तरीय भीमपुत्र आयडॉल २०२५ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
भीमपुत्र आयडॉल २०२५ हा राज्यस्तरीय पुरस्कार असून राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या १२ व्यक्तिमत्वांचा सन्मान या उपक्रमाअंतर्गत केला जाणार आहे. या निमित्ताने या सर्वांच्या कार्याची माहिती देणारा विशेषांकही प्रकाशित केला जाणार आहे. यासोबतच या व्यक्तींच्या व्हिडिओ मुलाखती विविध समाजमाध्यमांव्दारे लोकांपर्यंत पोचविल्या जाणार आहेत. दि. ६ एप्रिल रोजी बारामतीत सन्मानसोहळ्याचे आयोजन केले जाणार असून यावेळी या बारा व्यक्तिमत्वांना भीमपुत्र आयडॉल २०२५ हे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षीपासून दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमासाठी निवड समितीचे आयोजन करण्यात आले असून ही समिती पुरस्कारासाठी योग्य व्यक्तींची निवड करणार आहे. यासाठी योग्य व्यक्तींनी आपली माहिती पाठवावी तसेच या पुरस्कारासाठी योग्य वाटणाऱ्या व्यक्तींचीही माहिती पाठवावी असे आवाहन या उपक्रमाचे संयोजक राजेश कांबळे आणि घनश्याम केळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९११२२४००४५ किंवा ९८८१०९८१३८ या व्हाटसएप नंबरवर संपर्क साधावा.