महाराष्ट्र राज्यमुंबईसोलापूर शहर
Trending

बाळासाहेब ठाकरे जयंती 2025 बाळा साहेब ठाकरे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी सोलापूर:- बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुणे येथे झाला होता. त्यांच्या आईचे नाव रमाबाई ठाकरे होते. त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे हे एक लेखक आणि समाज सुधारक होते. त्यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि सत्ता देखील मिळवली. हिंदूंसाठी त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना हिंदूहृदय सम्राट असे संबोधले जाऊ लागले.बाळासाहेबांनी कारकिर्दीच्या सुरवातीला ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम केले. पुढे 1960 साली त्यांनी ‘मार्मिक’ साप्ताहिक सुरु केले. बाळासाहेबांनी 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली आणि 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असे धोरण घेऊन पक्ष वाढवण्यास सुरुवात केली. दैनिक सामनाचे ते संस्थापक आणि प्रमुख संपादक होते. बाळासाहेब नेहमी सांगत असायचे जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त सोलापूर जिल्ह्यात शाळेमध्ये जयंती साजरी करण्यात आली. हिंदु ह्दय सम्राट श्रीमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त

मुंलाची शाळा नं 1 व मुली शाळा..संगमेश्वर प्रशालेत शिव आरोग्य सेनेच्या प्रथमोपचार किट देण्यात आले ..त्या प्रसंगी शिव आरोग्य सेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक मा.दीपक आबा सुर्वे प्रकाश कोळी श्रीहरी चव्हाण शिवाजी माळी सुनील सांळुखे आनिल शिंदे रणधीर फाटे विजय पवार व सर्व शिक्षक उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button