नाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र राज्य

हॉटेल ग्रँड रिओ नासिक या ठिकाणी स्टाफ सेलिब्रेशन डे साजरी करण्यात आला

प्रतिनिधी प्रकाश दंडगव्हाळ संपादक योद्धा एक्सप्रेस न्युज

      1. Miप्रतिनिधी नासिक :- हॉटेल ग्रँड रियो  फोर स्टार, लेखानगर नासिक हॉटेलचे मॅनेजमेंट डायरेक्टर     M.Patil sar, श्री.चेतन पाटील सर हॉटेलचे  जी.एम श्री प्रकाश आहेर सर सरांच्या कल्पनेतून या वर्षापासून एका चांगल्या गोष्टीला सुरुवात झाली स्टाफ सेलिब्रेशन डे म्हणून सर्व स्टाफ हॉटेलच्या  हॉलमध्ये एकत्र येऊन स्टाफ सेलिब्रेशन डे साजरी केला. खेळ व डी.जे च्या नादात सर्वांनी मौज मजा केली. कार्यक्रमाचे नियोजन श्री प्रकाश आहेर सर,हेमंत बंग्गा सर, जयश्री मॅडम, एच. आर  मॅडम, वसीम सर, पवार सर, प्रियंका मॅडम, मराठे सर, अभी सर, यांनी केले. पुन्हा एकदा सर्व स्टाप ला  बालपण आठवलेआपण जे लहान असताना खेळ खेळत होतो. तेच खेळ आज या ठिकाणी बघायला मिळाले

.वयाचे कुठलेही बंधन या ठिकाणी नव्हते नींबू चमचा, बेडूक उडी, पाण्याने भरलेली बॉटल्स टेबलवर सरळ करणे, डीजे च्या आवाजात सर्वांनी खूप मनापासून आनंद साजरी केला . या ठिकाणी कुठलेही बंधन न होते सर्व स्टाफ मजा मस्ती करत होते

आजच्या या  खेळाच्या स्पर्धेमधून जे  विनर होतील त्यांना 26 जानेवारी 2025 रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर मॅनेजमेंट कडून योग्य ते पारितोषिक देण्यात येणार आहे. सरांच्या या संकल्पनेमधून बोध घेण्यासारखे आहे. कामाच्या ठिकाणी जर आपण असे एक परिवार म्हणून राहिलो तर नक्कीच त्या कंपनी असू द्या ऑफिस असू द्या हॉटेल असू द्या इतर कुठलीही वास्तु असू द्या त्या ठिकाणी स्टाफला काम करायला नक्की आवडेल  अनेकदा एखाद्या नव्या हॉटेल्स किंवाऑफिसमध्ये, किंवा इतर कामाच्या ठिकाणी काम करताना मनात एक भीती असते की, आपले इतरांसह जमेल की नाही. सगळा स्टाफ कसा असेल वैगरे वैगरे.तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अर्थात ऑफिसमध्ये घरानंतर जास्तीत जास्त वेळ घालवता. ही अशी जागा असते ज्यावर तुमची रोजी-रोटी अवलंबून असते. पण ऑफिसमध्ये सर्वांशी जुळवून घेत काम करणे अनेकदा कठीण असते. याचे कारण म्हणजे, सर्व लोक वेगवेगळ्या कुटुंबातील आणि वातावरणातून आलेले असतात

 

प्रत्येकाच्या विचारधारा वेगळ्या असतात. प्रत्येकाच्या मतात आणि विचारात जमीन-आसमानाचा फरक असतो. म्हणूनच कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी शिष्टाचार पाळणे आवश्यक आहे,जेणेकरून परस्पर संबंध चांगले राहतात आणि सर्व कामे सुरळीतपणे पूर्ण होतात. असेच हॉटेल ग्रँड रियो  मध्ये सुद्धा आहे या ठिकाणी श्री चेतन पाटील सर हे सर्व स्टाफ ला एक परिवारासारखे वागणूक देत असतात. कुठल्या स्टाफची चुकले तर त्यांना समजावून सांगतात त्यासाठी सर्वजण हॉटेलचा स्टाफ हा कुठल्याही डिपार्टमेंटचा असला तरी तो एक परिवारासारखाच राहतो. वेळप्रसंगी सर्व एकमेकांसाठी धावून जातात. सर्व स्टाफ नी मॅनेजमेंटचे मनापासून धन्यवाद मानले. आजचा दिवस त्यांच्यासाठी हा फार वेगळा होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button