महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य
कोल्हापूर बसस्थानका समोर ठाकरे गटाचे चक्काजाम आंदोलन
प्रतिनिधी समीर सनदी मीडिया अध्यक्ष

कोल्हापूर – एस. टी भाडेवाढ विरोधात राज्यात उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय. या भाडे वाढ विरोधात राज्यातील विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेय. त्या अनुषंगाने आज कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवत चक्काजाम आंदोलन केले. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
या चक्काजाम आंदोलनात विजय देवणे, राजू जाधव, संभाजी भोकरे. हर्षल पाटील. जयसिंग टिकले.अजित मोडेकर. म्हाळुं करिकट्टी. संजय पटकारे, विनोद खोत, भरत आमते नितीन डावरे.संदीप कांबळे.वैभव आडके संतोष रेडेकर, राजू यादव, विराज पाटील, स्मिता सावंत, रामदास पाटील शशिकांत बिडकर, समीर देसाई विकास पाटील.अतुल परब, सुहास डोंगरे, शौनक भिडे यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.