कोल्हापूर उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद:२२० जणांनी केले रक्तदान:
प्रतिनिधी किरण पाटील मामा कोल्हापूर

उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या रक्तदान शिबिरास प्रतिसाद:२२० जणांनी केले रक्तदान:
रस्ता सुरक्षा अभियान
बातमी:उजळाईवाडी: “रस्ता सुरक्षा अभियान-2025″च्या निमित्ताने महामार्ग पोलीस उजळाईवाडी आणि महालक्ष्मी ब्लड बँक कागल , युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळ शिरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत रक्तदान शिबिरास 220 जणांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. समर्थ मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे पार पडलेल्या या शिबिरात प्रत्येक रक्तदात्यानी चांगला प्रतिसाद दिला.
मोफत आरोग्य तपासणी शिबिरात, रक्त तपासणी आणि आकाश दीप नेत्रालय तर्फे मोफत डोळे तपासणी करण्यात आली. उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सपोनि सत्यराज घुले, पोलिस उपनिरीक्षक सुनिल माळगे, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप जाधव, आदींनी वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्त वाहतूक नियमांबद्दल जनजागृती केली. तसेच आरोग्य तपासणी शिबिर साठी महामार्ग मृत्युंजय दुत मोहन सातपुते, मृत्युंजय दुत जयकुमार मोरे, सागर स्वामी महाराज याचे सहकार्य लाभले.योध्दा वाहन चालक मालक याचे सहकार्य लाभले
करवीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, दत्ता पाटील, महेश जाधव, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गायकवाड, राजेश अडुळकर, प्रसाद सर, मोहन गवळी महामार्ग पोलीस केंद्र उजळवाडी सर्व स्टाफ, महालक्ष्मी ब्लड बँक ,कागल, युवा ग्रामीण विकास संस्था आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळचे समुपदेशक प्रल्हाद कांबळे, प्रतीक्षा जाधव, हरी ओम गागडे, आनंद सज्जन, महेश केसरे व कर्मचारी शिबिर रस्ता सुरक्षा आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत महत्त्वाचे ठरले.
फोटो ओळ: उजळाई वाडी महामार्ग पोलिस मदत केंद्र वत्तीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर व युवा ग्रामीण विकास संस्था मार्फत मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रतिसाद मिळाला.