महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य

पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई दोन गावठी पिस्तुलासह चार जिवंत काडतुस हस्तगत आरोपीला जारगाव जवळ अटक

प्रतिनिधी संदीप कोळी नगरदेवळा , मुख्य संपादक श्री प्रकाश दंडगव्हाळ

प्रतिनिधी संदीप कोळी :- पाचोरा शहरातील जळगाव चौफुली येथील पोलिसांनी एका इसमाला दोन गावठी कट्टे आणि चार जिवंत काडतूसासह अटक केली आहे याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अरबाज खान जफर खान वय 24 वर्ष राहणार अक्का नगर जळगाव तालुका पाचोरा असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की जळगाव चौफुली पाचोरा परिसरात एक इसम गैर कायदेशीर गावठी कट्टे घेऊन फिरत आहे

आणि तो कोणत्यातरी गुन्हेगारी करण्याच्या उद्देशाने ही शस्त्र वापरू शकतो या माहितीनुसार पोलीस कॉन्स्टेबल शिंपी आणि पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी स्थानिक दोन पंचांच्या उपस्थितीत सापळा टाकून कारवाई करण्याचा निर्णय घेतला दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारास 4:30 वाजता पोलिसांनी जळगाव चौफुली परिसरात छापा टाकला यावेळेस संशयित इसमाच्या कमरेजवळ वारंवार हात लावत असल्याचे पाहून पोलिसांनी त्याला चारी बाजूने वेडा घातला जुहीर भाई रेडीयर्स दुकानाजवळ त्याला पकडली यावेळेस तो पॅंटीच्या खिशात हात घालत असल्याचे पाहून पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांनी त्याच्या दोन्ही हात दाबून धरले त्याच्या अंग झडती दरम्यान त्याच्या पॅन्टच्या खिशातून प्रत्येकी 20000 रुपये किमतीचे दोन गावठी कट्टे आणि दोन हजार रुपये किमतीचे चार जिवंत काङतुस सापडले त्याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्या गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेची पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण के करीत आहेत


https://whatsapp.com/channel/0029VayuIDSAzNc0lgw8Wx15

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button