अपरिचित इतिहास

श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे शांकभरी नवरात्रोत्सवाची सांगता

श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थान येथे शांकभरी नवरात्रोत्सवाची सांगता पारंपारिक उत्साहात व वेदमंत्रांच्या जयघोषात झाली.

प्रतिनिधी नंदकुमार बगाडेपाटील:- श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे शांकभरी नवरात्रोत्सवाची सांगता श्रीक्षेत्र मोहटादेवी देवस्थान येथे शांकभरी नवरात्रोत्सवाची सांगता पारंपारिक उत्साहात व वेदमंत्रांच्या जयघोषात झाली. राज्याच्या विविध भागांतून हजारो भाविकांनी दिवसभरात भेट देवून दर्शन घेतले. सप्तशती पाठांची पुर्णाहुती होमहवनाने झाली.

देवस्थानचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, ॲड. विक्रम वाडेकर, डॉ. श्रीधर देशमुख यांच्या हस्ते होमहवन महापुजा करून वेदमंत्राच्या घोषाने परिसर दुमदमला.

देवस्थानमार्फत वासंतिक, शारदीय व शांकभरी अशी तीन नवरात्रे साजरी होतात. शांकभरी नवरात्रोत्सवामध्ये रोज पारंपारिक उत्सव, त्रिकाल आरत्या, सुवासिनी पूजन, अन्नदान करण्यात आले. शाकाहार महात्म्य व उपयोगिता याबाबतचे वर्णन देवी महात्म्य मध्ये सांगून शांकभरी पौर्णिमेशी त्याचा संबंध आहे. शांकभरी पौर्णिमेला गावोगावच्या सुवासिनी विविध प्रकारच्या पालेभाज्या व पुरणपोळीचा महानैवेद्य देवीला आणतात. नवसाची पुर्ती झाली म्हणुन सवाष्णी जेवु घालण्याची मोहटादेवी गडावर परंपरा आहे.

सकल भारतवासीय देवीभक्तांचे उत्तम आरोग्य व धनधान्य, सुख समृध्दी प्राप्त व्हावी, जणमाणंसामध्ये ऐक्य, प्रेमभाव निर्माण व्हावा, असा संकल्प करुन देवीस प्रार्थना करण्यात आली.

पुणे येथील उद्योजक श्री राजेंद्र भोंडवे परिवाराने संकल्पपूर्ती झाल्याने शांकभरी पौर्णिमेस देवीच्या मंदिर गाभाऱ्याची आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.

होमहवन कार्यक्रमास सौ. लता दहिफळे, सौ. वर्षा वाडेकर, डॉ. ज्योती देशमुख, राहुरी येथील श्री बंडेशकुमार शिंदे, सौ. शुभांगी शिंदे, सौ. मनिषा आहेर, विश्वात्मक जंगली आश्रम कोकमठाणचे विश्वस्त श्री प्रभाकर जमधडे तसेच देवस्थानचे विश्वस्त श्री बाळासाहेब दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे पौरोहित्य भूषण साकरे, भास्कर देशपांडे, महेश झेंड, विशाल पाटेगावकर, रुपेश जोशी, बाळासाहेब क्षीरसागर, भगवान जोशी यांनी केले. शांकभरी पौर्णिमेनिमीत्ताने हरी कीर्तन, भजन व भावीक भक्तांना महाप्रसाद वाटप करणेत आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button