सोलापूर शहरात सध्या मटक्याचा सुळसुळा सुरू असल्याचे बोलले जात आहे
प्रतिनिधी सोलापूर सुमित भांडेकर

प्रतिनिधी सोलापूर:-एकीकडे पोलीस प्रशासनाची कडक शिस्त सामान्य नागरिकांसाठी विविध समस्या निर्माण करते दुसरीकडे दोन नंबर धंद्याकडे मात्र हेतू पुरे सर कानाडोळा करते असे सर्व सामान्य लोकांकडून बोलले जाते सोलापूरचे पोलीस आयुक्त आपल्या कडक शिस्तीला व नियमाचे पालन करतांना दिसतात
पण मुळातच सोलापूर शहरात सरास मटका सुरू कसे काय आहे ॽ हा प्रश्न अनुत्तरीत राहतो सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाणे फौजदार चावडी पोलीस ठाणे सलगर वस्ती पोलीस ठाणे सदर बाजार ठाणे एमआयडीसी पोलीस ठाणे सगळीकडे खुलेआम मटका सुरू असल्याचे बोलले जातात आहे, सर्वसामान्यपणे महिला ज्येष्ठ नागरिक ये जा करण्याच्या मार्गावरच गल्लीबोळात असे अवैध व्यवसाय सुरू असून पोलीस मात्र कुठलीही कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे तरी वरील व्यवसायावर त्वरित कायदेशीर कडक कारवाई करून कायमचे बंद करून गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्यावा असे जाणकारांचे मत आहे मटक्याचा हव्यासापोटी सर्व कामगार गोरगरीब यंत्र कामगार बळी पडतात, आणि कुटुंब उध्वस्त होतात याबाबत पोलीस ताबडतोब कारवाई करावी असे जनतेतून मागणी जोर धरत आहे