महिला विशेष
YVCM हेल्पिंग फाउंडेशन एनजीओ अंतर्गत महिला बचत गटासाठी सभासद नोंदणी सुरू
YVCM हेल्पिंग फाउंडेशनच्या अंतर्गत नॅशनल बँकेचे झिरो बॅलन्स अकाउंट व 10 लाखाचा इन्शुरन्स काढून देण्यात आला

प्रतिनिधी समीर सनदी :-YVCM हेल्पिंग फाउंडेशन एन.जी.ओ अंतर्गत महिला बचत गट महाराष्ट्र राज्य आज दि.13-01-2025. वहिफा गफार कुरेशी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष यांना संस्थेकडून नॅशनलाईज बँकत झिरो बॅलन्स अकाउंट व 10 लाखाचा अपघाती इन्शुरन्स काढून देण्यात आला.
ही सुरुवात झाली आहे तरी नवीन सभासद होणाऱ्या महिलांना आर्थिक लाभ होणार.YVCM हेल्पिंग फाउंडेशन एनजीओ अंतर्गत योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र भारत, योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह, युवा स्वयंसेवक समुदाय मिशन हेल्पिंग फाउंडेशन अशी विविध उपक्रमातून हेल्पिंग व मदत केली जाते, योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री किरण पाटील मामा, संस्थेसाठी अहोरात्र कार्य करत असतात येणाऱ्या काळामध्ये महिला बचत गटासाठी सरकारच्या विविध महिला योजनेसाठी महिलांना रोजगार मिळवण्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी YVCM हेल्पिंग फाउंडेशन महिला बचत बचत गटात आपले नाव नोंदणी करावे असे आव्हान सर्व महिलांना करण्यात येत आहे.
