YVCM हेल्पिंग फाउंडेशन संचालित योद्धा वाहन चालक-मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र भारत
पुणे येथील चालकाचे वसई या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंग बाईकला धक्का लागल्याने पोलीस स्टेशनच्या बाहेर चालकाला काढावी लागली रात्र

प्रतिनिधी बापू धन्वे पालघर :- योद्धा हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ, संस्था उपाध्यक्ष सुधीर पोळ संस्था अनेक वर्षांपासून चालकांसाठी मदत कार्य करत आहे. आज दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ यांना पुणे येथून फोन आला की चालक सागर वरवडे गाडी क्रमांक एम.एच 12 वी.एफ ५६२५ चालक रात्री मेडिसिन घेण्यासाठी मेडिकलवर थांबले होते मेडिसिन घेऊन झाल्यानंतर आपल्या गाडीत बसले व गाडी रिव्हर्स घेताना रात्री अंधारात अंदाज न आल्याने पोलीस पेट्रोलियम बाईकला थोडासा नॉर्मल टच झाली पोलीस बाईक चा आरसा हा डॅमेज झाला त्यावेळेस सागर यांनी तो भरून देण्यासाठी पोलीस कॉन्स्टेबल यांना नुकसान भरपाई म्हणून १००० रुपये देण्याचे कबूल केले.
परंतु कॉन्स्टेबलांनी न ऐकता गाडी नायगाव बीट चौकीला जमा केली. चालकाला रात्रीच पुण्याला रिटर्न यायचे होते कारण की सकाळी त्याला पुन्हा सहा वाजता बुकिंग होती. कॉन्स्टेबल यांनी त्याला दहा वाजता भेटण्यासाठी सांगितले होते. योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ यांनी
श्री बापू धनवे पालघर जिल्हाध्यक्ष यांना कॉल करून सर्व माहिती दिली. बापू धन्वे व वसई विरार अध्यक्ष आबा पाटील यांनी कॉन्स्टेबल साहेबांशी बोलून १ रुपयांना न भरता गाडी सोडून दिली. सागर वरवडे यांना योद्धा हेल्पिंग फाउंडेशन चे आभार व्यक्त केले सागर यांना पुढील मार्गस्थ रवाना केल. योद्धा हेल्पिंग फाउंडेशन कडून नायगाव बीट चौकीचे निरीक्षक साहेब व कॉन्स्टेबल साहेब यांचे मनापासून आभार अशी सहकार्य आमच्या चालकांना असू द्या