आर्थिक घडामोडीकोल्हापूर जिल्हाकोल्हापूर शहरमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यमहिला विशेषराजकीय

जि. कोल्हापूर ग्रामपंचायत अंबप यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 सन 2024-25 या वर्षात एकूण 28 नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.

प्रतिनिधी राहुल जंगम योद्धा एक्सप्रेस न्युज

User Rating: Be the first one !

प्रतिनिधी राहुल जंगम :-अंबप ग्रामपंचायत ता.हातकणंगले जि. कोल्हापूर ग्रामपंचायत अंबप यांच्या विशेष प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-2 सन 2024-25 या वर्षात एकूण 28 नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.

एकाच वर्षात इतक्या मोठ्या संख्येने ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवून, यशस्वी करण्यासाठी लोकनियुक्त सरपंच सौ. दिप्ती विकासराव माने, यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, उपसरपंच अशिफ अबुबकर मुल्ला, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य अविनाश अंबपकर, माणिक दाभाडे, सरिता कांबळे, संगीता जाधव, ज्योती माने, सारिका हिरवे, कृष्णात गायकवाड, संदीप पाटील, अजित माने, रेखा गायकवाड, जयश्री शिंदे, यांचे विशेष सहकार्य आणि ग्रामपंचायत अधिकारी डी. व्ही. शिंदे, रोजगार सेवक संदीप डोंगरे व सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आवश्यक प्रशासकीय कागदपत्रांची तत्परतेने केलेली पूर्तता यामुळेच आपण प्रधानमंत्री आवास योजनेचे उद्दिष्ट गाठू शकलो. प्रधानमंत्री आवास योजने मधून घरकुल मंजूर झालेल्या सर्व लाभार्थ्यांचे

a

अंबप ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात लोकनियुक्त सरपंच सौ. दीप्ती विकासराव माने, उपसरपंच अशिफ अबुबकर मुल्ला, सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र माने सर, माजी सरपंच विश्वनाथ पाटील तात्या, पोलीस पाटील पंढरीनाथ गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष उंडे, हातकणंगले संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य तानाजी ढाले, माजी सरपंच वंदना चिबडे, ग्रामपंचायत सदस्य माणिक दाभाडे, अजित माने, रेखा गायकवाड, संगीता जाधव, सरिता कांबळे, सारिका हिरवे आणि जयश्री शिंदे यांच्या हस्ते मंजुरीपत्र व पहिला हप्ता वितरण करण्यात आला… यावेळी ग्रामपंचायत अधिकारी डी.व्ही. शिंदे , रोजगार सेवक संदिप डोंगरे, ग्रामपंचायत कर्मचारी सरिता वाघमोडे, पंकज अंबपकर, आरती जाफळे, स्वप्निल कांबळे,घरकुल लाभार्थी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button