महाराष्ट्र राज्यमाहिती तंत्रज्ञानमुंबई

बालविवाह लावणारा आचारी, भटजी, मंडपवाल्यासह १५८ वऱ्हाडींवर गुन्हा

गंगापूरची घटना • आरोपींत नवरा, सासू-सासरे, मामा, मामींचा समावेश

प्रतिनिधी । छत्रपती संभाजीनगर /गंगापूर

पालकांच्या अशिक्षितपणामुळे आणि घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलींचे लग्न लावून दिले जात आहेत. असाच एक प्रकार झाल्यानंतर जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाइन आणि जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या पथकाने कारवाई करत नवरदेवासह सासरची मंडळी, मंडप व्यवस्थापक, आचारी, भटजीसह तब्बल १५८ वन्हाडींवर बालविवाह प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीने गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना असल्याचा दावा बालकल्याण समितीने केला आहे.

एका पंधरा वर्षांच्या मुलीचे वडील भोळसर तर आईचे छत हरवलेले असल्याने ती गंगापूर तालुक्यातील एका

दोन वर्षांचा कारावास, एक लाख रुपये दंडाची शिक्षा

बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ कायद्यान्वये, बालविवाह करणाऱ्यांवर कलम ९, १०, ११ नुसार गुन्हा दाखल केला जातो. यामध्ये आरोपींना दोन वर्षांचा कारावास आणि एक लाख रुपये द्रव्य दंडाची शिक्षेची तरतूद आहे.गावात मामाकडे राहत होती. १५ वर्षे ११ महिन्यांच्या या मुलीचा पैठण येथील २३ वर्षांच्या तरुणासोबत १३ नोव्हेंबर २०२४ रोजी विवाह लावण्यात आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर महिला बालविकास, बालकल्याण समिती यांच्या आदेशानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी राहुल चराटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुलीचा मामा, मामी, नवरदेव, सासू-सासरे, मंडप व्यवस्थापक, आचारी आणि भटजीयांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर अल्पवयीन मुलीला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार मुलींच्या बालगृहात दाखल करण्यात आले. १०९८ वर संपर्क साधा कोणतीही मुलगी अनाथ असेल किंवा पालक तिचा सांभाळ करू शकत नसतील, तर महिला वबाल विकास विभागाच्या बालगृहात बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार तिला दाखल करता येते. टोल फ्री क्रमांक १०९८ वर संपर्क साधल्यास मदत मिळू शकते,पोक्सोसह गुन्हा दाखल करण्याचे निर्देश • मुलीला आई नाही, वडील भोळसर आहेत, त्यामुळे मामाने लग्न लावून दिले. मुलगी शारीरिक कमजोर आहे. अनेक वेळा साखरपुडा केल्याचे नागरिक सांगतात. त्यामुळे कारवाई करता येत नाही. यामध्ये बालविवाह झाल्याचे पुरावे असल्याने आम्ही बालविवाह प्रतिबंधक अधिकाऱ्याला गुन्हा दाखलकरण्याचे निर्देश दिले, आम्ही मेडिकल करून गुन्हा दाखल केला. राज्यामध्ये एवढ्या मोठ्या सहभागींवर गुन्हा दाखल होण्याची पहिलीच घटना आहे. पोक्सोसह अन्य काही कलम लावण्याचे निर्देश दिले आहे. बालकल्याण समिती.- आशा शेरखाने-कटके, अध्यक्ष,

असे महिला व बाल विकास अधिकारी रेशमा चिमद्रे यांनी सांगितले. या उपाययोजना करणे गरजेचे : लग्न

लावणाऱ्या प्रत्येक दोषींवर गुन्हा दाखल होण्यास सुरुवात झाल्यास याला चाप बसू शकेल, असे मत महिला बालविकास अधिकारी यांनी व्यक्त केले. बालविवाह रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये कायद्याविषयी जागृती करणे, सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

एस.टी. महामंडळाकडून कर्मचा-यांचा पीएफ थकला

राज्यातील एसटी कर्मचा-यांच्या पगाराला उशीर होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. कर्मचा-यांना पगारही थकीत ठेवल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मात्र,े चक्क एसटी कर्मचा-यांच्या पीएफचे पैसेच महामंडळाने गेल्या ४ महिन्यांपासून भरले नसल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, एसटी महामंडळाने बस दरात १५ टक्के भाडेवाढ करत ही भाडेवढ गरजेचं असल्याचं म्हटलंय. सरकार नव्या बस घेत असून महामंडळाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष केंद्रीत करत ही भाडेवाढ महत्त्वाची असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले होते. ऑक्टोबर महिन्यापासून एसटी महामंडळाने पीएफचे हफ्ते भरले नसल्याने ज्या कर्मचा-यांना आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत, त्यांना ते पैसेच काढता येईना झालेत.

मुलीच्या लग्नासाठी, नवीन घर विकत घ्यायचे असेल किंवा नवे घर बांधायचे असल्यास पीएफचे पैसे काढता येतात. मात्र, एस.टी.कर्मचा-यांना त्यांच्या प्रॉव्हीडंट फंडाच्या रकमेतून रक्कम काढायची असेल तर ती सध्या काढता येत नाही. कारण, एस.टी. महामंडळाकडे निधीचा तुटवडा असल्याने प्रॉव्हीडंट फंडासाठीचे हप्ते भरणे महामंडळाला जमलेले नाही. ऑक्टोबर महिन्यापासून हे हप्ते थकीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

महामंडळाला मिळणारा निधी हा कर्मचा-यांच्या मासिक पगारावर खर्च करावा लागतोय, असे एसटी महामंडळाचे अधिकारी सांगतात.
सध्या तोट्यात असलेल्या महामंडळाला एसटी कर्मचा-यांच्या पीएफमधील रक्कम भरण्यासाठी राज्य सरकारकडून निधीची अपेक्षा आहे. मात्र, अद्याप तरी राज्य सरकारने निधी दिलेला नाही. विशेष म्हणजे जे कर्मचारी सेवानिवृत होत आहेत, त्यांचा फंड मात्र एक महिन्याच्या आत दिला जात आहे.

परंतु, जे कार्यरत असलेले कर्मचारी आहेत, त्यांना विविध कारणांसाठी आपल्या फंडातील रक्कम काढायची असल्यास त्यांना वेट अँड वॉच अशी भूमिका महामंडळाचे आहे. त्यामुळे, एसटीच्या कर्मचा-यांना आर्थिक तंगी सहन करावी लागत आहे. आमच्या मागण्यांकडे शासन किंवा महामंडळातील अधिकारी लक्ष देतील का, असा सवाल यानिमित्ताने एसटी कर्मचा-यांनी विचारला आहे. दरम्यान, एसटी महामंडळाला कर्मचा-यांच्या पीएफ हप्त्यासाठी महिन्याला 480 ते 490 कोटी रुपयांच्या निधीची गरज असते.

गिरीष देशमुख यांची चौकशी करा – गुणरत्न सदावर्ते
हे अत्यंत वेदनादायी आहे, कष्टकरी-कामगारांच्या पीएफच्या हफ्त्याचे पैसे पाठवले जात नाहीत, हे भरत गोगावले अध्यक्ष असल्यापासून सुरू झालं आहे. तसेच, सध्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनाही याबाबत 1 आठवड्यांपूर्वीच माहिती दिली आहे. गिरीष देशमुख नावाचे अधिकारी आहेत, जे दुस-या कामासाठी कामगारांच्या हक्काच्या पैशाचा वापर करण्यासाठी देत आहेत. त्यामुळे, गिरीष देशमुख यांची चौकशी झाली पाहिजे, असे कामगार संघटनेचे नेते एड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे १९ फेब्रुवारी रोजी सर्व आमदार-खासदाराना घेऊन येते 19 फेब्रुवारी प्रयागराज येथे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार-खासदारांना घेऊन येत्या १९ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे महाकुंभाला जाणार आहेत. कुंभस्रानाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे शह देणार आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या काही आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याने हे आमदार नाराज असल्याचे समजते. या आमदारांची नाराजी देखील आता उपमुख्यमंत्री शिंदे यांना दूर करावी लागणार आहे.

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू असतात. महत्वाच्या बैठकांना त्यांची अनुपस्थिती असली की या चर्चांना वेग येतो. दुुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सातत्याने राजकीय धक्के देण्याचे काम सुरूच ठेवले आहे. नुकतेच माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आता शिवसेना ठाकरे गटाचे जितेंद्र जनावळे यांनी देखील राजीनामा दिला आहे. ते विलेपार्ले येथील उपविभागप्रमुख होते.

उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे राजकीय विरोधक हिंदुत्व सोडल्याची टीका सातत्याने करत असतात. आता हिंदुंचा सर्वात प्रमुख असा कुंभमेळा प्रयागराज येथे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी या कुंभमेळयात जाउन कुंभस्रान केले आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कुंभस्रानासाठी जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि मंत्री देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे या निमित्ताने शक्तीप्रदर्शनही करतील. सोबतच उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्यावरून हा एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न असणार आहे.

आमदारांच्या सुरक्षेत कपात
शिवसेना शिंदेगटाच्या काही आमदारांच्या सुरक्षेत वाय प्लस वरून वाय अशी कपात करण्यात आल्याने आमदारांमध्ये नाराजी असल्याचे समजते. महायुतीचे सरकार आल्यानंतर शिंदेसेनेच्या आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. याबाबत आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ­ शिंदे यांच्याकडे आपले म्हणणे मांडल्याचे समजते. या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button