धुळे जिल्हामहाराष्ट्र राज्यमहिला विशेष

योद्धा न्यूज !! देवपुरातील उच्चभ्रू वसाहतीतील कुंटणखाण्यावर कारवाई: २ तरुणासह महिलेविरोधात गुन्हा

देवपूर येथील अवैध कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली.

प्रतिनिधी धुळे : धुळे शहरातील देवपूर भागात उच्चभ्रु सोसायटीत सुरू असलेल्या अवैध कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली. देवपूर पोलीस ठाण्यात दोन तरुण आणि कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरात गेल्या महिन्यापासून लॉजमध्ये चालणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहे. त्यातच देवपूर परिसरात काही उच्चभ्रू वसाहतींमध्ये अशा प्रकारचे कुंटण खाणे चालवले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी पोलीस पथकाला या माहितीची खात्री करून कारवाई करण्याचे आदेश केले.

देवपूर भागातील एका उच्चभ्रु सोसायटीत एक महिला चार महिन्यांपूर्वी भाडेतत्त्वावर घर घेऊन कुंटनखाना चालवित होती. छापा कारवाईवेळी गौरव लोटन महाजन, (रा. वरखेडी) व सौरभ राजेंद्र देवरे (रा. वरखेडी) असे दोन तरुण महिलांसोबत आढळून आले. कुंटणखान्यामधील तीन पीडित महिलांना रेस्क्यू करुन महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. कुंटणखाना चालविणारी महिला, दोन तरुण गिऱ्हाईक अशांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी-धुळे शहर उपविभाग राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, श्रीराम पवार, सपोनि. श्रीकृष्ण पारधी, अमित माळी, मुकेश वाघ, शशिकांत देवरे, संदीप पाटील, धर्मेंद्र मोहिते, सुशिल शेंडे, शिला सुर्यवंशी, राजीव गिते, गुलाब पाटील, भरोसा सेल येथील पोलीस उपनिरीक्षक कल्याणी पाटील, प्रियंका उमाळे व मोनाली सैंदाणे यांनी केली.

रिक्षा पासिंगसाठी मोटार वाहन निरीक्षकाच्या सांगण्यावरून खासगी इसमाने स्वीकारली लाच

प्रतिनिधी परभणी :- रिक्षा पासिंग करून फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी मोटर वाहन निरीक्षकाच्या सांगण्यावरून खासगी इसमाने तक्रारदाराकडून पाचशे रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई शुक्रवारी सायंकाळी करण्यात आली. याप्रकरणी ताडकळस ठाण्यात मोटार वाहन निरीक्षक याच्यासह खासगी इसमावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. ही कारवाई अहिल्यानगर येथील एसीबीच्या पथकाने केली.

संतोष नंदकुमार डुकरे मोटार वाहन निरीक्षक वर्ग एक असे लाच प्रकरणातील लोकसेवकाचे नाव आहे. आरटीओ कार्यालय असोला येथे मोटार व परिवहन निरीक्षक संतोष डुकरे कार्यरत आहेत. तक्रारदार हे रिक्षा चालक असून त्यांची रिक्षा पासिंग करून फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक डुकरे यांच्यासाठी खासगी इसम मुंजा मोहिते याने पाचशे रुपये लाचेची मागणी केली होती. डुकरे यांनी तक्रारदार यास खाजगी इसम मुंजा यांना भेटण्यासाठी इशाराद्वारे सांगून रिक्षाच्या कामासाठी लाचेची मागणी करण्यास खासगी इसम मुंजा यास प्रोत्साहन दिले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय परभणी येथे अहिल्यानगर येथील एसीबी पथक शुक्रवारी दाखल झाले होते. त्यानंतर खासगी इसम मुंजा मोहिते यांनी मोटार वाहन निरीक्षक डुकरे यांच्यासाठी पंचासमक्ष पाचशे रुपये लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यास रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध ताडकळस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे, सापळा पथक हरून शेख, सचिन सुद्रुक, गजानन गायकवाड यांनी केली. तपास पोलीस उपअधीक्षक अशोक इप्पर करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button