कोल्हापूर शहरात व जिल्ह्यात गणेश जयंती उत्साहात
प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योद्धा हेल्पिंग फाउंडेशन

प्रतिनिधी कोल्हापूर :-वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देंव, सर्व कार्येषु सर्वदा ।।’असा जयघोष, गणेशयाग, होमवहन, प्रवचन, भजन अशा भक्तिमय व उत्साही वातावरणात कोल्हापूर शहर, उपनगरात शनिवारी गणेश जयंती साजरी झाली.
श्री पितळी गणपती मंदिर ताराबाई पार्क कोल्हापूर श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक रिक्षा मित्र मंडळ ताराबाई पार्क कोल्हापूर आणि व्यवस्थापक कसबा बावडा कोल्हापूर यानिमित्त दूध वाटप , सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली तर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. उमा टॉकिज परिसरातील ओढ्यावरील सिद्धिविनायक गणेश मंदिर,पेठेतील न्यू शिवनेरी तरुण मंडळ, कोषागार कार्यालयाजवळील स्वयंभू गणेश मंदिर, शाहूपुरी सहावी गल्ली कुंभार गल्ली पंचमुखी गणेश मंदिर, जोशी गल्लीतील गणेश मंदिरात तर शिवाजी चौकातील शिवाजी चौक तरुण मंडळातर्फे जन्मकाळ व पालखी सोहळा भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला.गणेश भक्तांनी सकाळपासून मंदिरात गर्दी केली होती.