कोल्हापुर जिल्हा पालकमंत्री मा.सौ.माधुरी मिसाळ यांची देवगिरी येथे सदिच्छा भेट
प्रतिनिधी श्री रजनीकांत धोंगडे, हातकलंगले तालुका योद्धा एक्सप्रेस न्युज

पेठ वडगाव प्रतिनिधी:-रजनिकांत धोंगडे वडगांव नगरीचे भाग्यविधाते,रौप्य महोत्सवी नगराध्यक्ष स्व.श्रीमंत विजयसिंह बळवंतराव यादव (साहेब) यांच्या १० व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना.सौ.माधुरी मिसाळ यांनी आज देवगिरी वरती सदिच्छा भेट दिली…यावेळी यादव साहेबांच्या राजकीय कारकिर्दीची सर्व इत्यंभूत माहिती त्यांच्या कन्या सौ.विद्याताई गुलाबरावजी पोळ यांनी त्यांना दिली…वडगांवातील सामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून त्यांनी आपली राजकीय हयात व्यतीत केली.
तसेच यादव साहेबांचे वडगांव नगरीवर असणारे प्रेम ही जनता कदापिही विसरणार नाही असे गौरवोद्गार मा.ना.सौ.माधुरी मिसाळ यांनी यावेळी व्यक्त केले…वडगांव या शहराचा विचार करता तसेच पंचक्रोशीतील नागरिकांची सोय लक्षात घेता पेठ वडगांव हा नवीन तालुका निर्मित करावा याचीही यावेळी चर्चा करण्यात आली आणि त्यास अनुकूल सकारात्मक प्रतिसाद मा.ना.सौ.माधुरी मिसाळ यांनी दिला…यावेळी मा.श्री.गुलाबरावजी पोळ (साहेब)माजी नगराध्यक्ष मा.श्री.मोहनलाल माळी शेठजी तसेच नियोजित नवीन वडगांव तालुका निर्मित कृती समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते..