मा.डॉ. सुनीलजी सरोदे सर अध्यक्ष – माऊली मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि. यांचा वाढदिवस उत्साहात साजरे
प्रतिनिधी हरीश चव्हाण नासिक योद्धा एक्सप्रेस न्युज जिल्हा प्रतिनिधी

प्रतिनिधी नासिक :-प्रत्येक दिवस नवा अनुभव घेऊन येतो, पण वाढदिवस हा एक विशेष दिवस असतो. हा दिवस आनंद, खुशी आणि नवीन आशा घेऊन येतो. वाढदिवस म्हणजे आपल्या प्रियजनांसोबत एकत्र येऊन त्यांचा खास दिवस साजरा करण्याचा, आनंद आणि उत्सव अनुभवण्याचा वेळ आहे.
हा दिवस जीवनातील यश, स्वप्ने आणि प्रेम साजरे करण्याची एक खास संधी देतो. असेच एक व्यक्तिमत्व आपल्या सर्वांना लाभलेले वेळ प्रसंगी गोरगरिबांसाठी धावत जाणारे व मदत करणारे माननीय श्री. डॉ. सुनील सरोदे सर माऊली मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी अध्यक्ष यांचा आज वाढदिवस लासुर या ठिकाणी साजरी करण्यात आला. यावेळेस सरांचे मित्रमंडळी उपस्थित होते.
योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तसेच योद्धा एक्सप्रेस न्युज चे नासिक जिल्हा प्रतिनिधी हरीश चव्हाण या कार्यक्रमाच्या वेळेस उपस्थित होते. हरीश चव्हाण साहेबांनी सुनील सरोदे साहेबांना फुल गुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच साहेबांना योद्धा हेल्पिंग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ, संस्थापक उपाध्यक्ष श्री सुधीर पौळ, यांच्यातर्फे शुभेच्छा जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुम्हाला यश आणि आनंद मिळो, अशी माझी प्रार्थना आहे. तुमचा जन्मदिवस आनंद आणि सुखाने भरलेला असो! संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्य यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा