आर्थिक घडामोडीनासिक क्राईम रिपोर्टपुणेमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य

पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी नवा ट्विस्ट; आरोपी अगरवाल दाम्पत्याची कोर्टात सुटकेची याचिका

पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी नवा ट्विस्ट आलाय. आरोपी अगरवाल दाम्पत्याने कोर्टात सुटकेची याचिका दाखल केलीय.

प्रतिनिधी पुणे:-पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेत राहिलं. 9 महिन्यानंतरही या अपघातातील मृतांचे कुटुंबिय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र त्याआधीच आता आरोपींनीच न्यायाचा धावा केलाय आणि आपली अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय.

पोर्शे कार अपघात प्रकरणात काय नवा ट्विस्ट आलाय. पुण्यातल्या कल्याणनगरातील गाजलेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. या मे 2024 पासून अटकेत असलेले अल्पवयीन आरोपी मुलांचे आईवडील शिवानी आणि विशाल अगरवाल यांनी आता सुटकेसाठी कोर्टात याचिका दाखल केलीय. कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आम्हाला बेकायदेशीरपणे अटक केल्याचा दावा अगरवाल दाम्पत्यानं आता केलाय. आमच्या सांविधानिक अधिकारांचं उल्लंघन झाल्याचा दावा करत अगरवाल दाम्पत्यानं मुंबई उच्च न्यायालयाकडे सुटकेची मागणी केलीय.


‘अटक बेकायदेशीर, आमची सुटका करा’
पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणी नवा ट्विस्ट
आरोपी अगरवाल दाम्पत्याची कोर्टात सुटकेची याचिका

पुण्यात 19 मे 2024 च्या मध्यरात्री कल्याणीनगरात पोर्शे कारचा अपघात
आलिशना पोर्शेच्या धडकेत अश्विनी कोस्टा, अनिश अवधियाचा मृत्यू
अल्पवयीन आरोपीला न्यायालयाकडून निबंध लिहिण्याची शिक्षा
प्रचंड टीकेनंतर पुणे पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलले
याप्रकरणी ससून रुग्णालयातील डॉक्टरांवर कारवाई
आरोपी अल्पवयीन असल्यानं वडील विशाल अगरवालला अटक
रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी आरोपीची आई शिवानीलाही बेड्या
अपघातप्रकरणी एकूण 10 जणांना महिनाभरात अटक

विशाल आणि शिवानी अगरवालसह हे सगळे आरोपी मागच्या 9 महिन्यापासून तुरुंगात आहेत. गुन्ह्याचं स्वरुप बघात एकालाही अजूनही जामीन मिळालेला नाहीय. म्हणूनच आता अग्रवाल दांपत्यांनं आपली अटकच बेकायदेशीर असल्याचा नवा दावा केलाय आणि उच्च न्यायालयात धाव घेतलीय. त्यांचा हा दावा कोर्टाच्या दारात कितपत टिकेल हे भविष्यात कळेलच.

♦ऑनलाइन शेअर्स गुंतवणुकीचे आमिष, ४८ लाखांचा गंडा

प्रतिनिधी नाशिक

रक्कम शेअर्स मार्केटमध्ये ऑनलाइन गुतवणूक करण्याचे आमिष देत दोघांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आत्ता आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि सेवानिवृत्त अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार, मोबाइलवर एका कंपनीची लिंक आली. अर्थ मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास यावर अधिक समजेल असे

मांगत संबंधित कंपनीच्या शेअर्सची माहिती दिली. जाया नफा मिळेल म्हणून मेशनिष्त ऑनलाइन गुंतवली. यानंतर चार महिने झाले. शेअर्समध्ये नफा झाल्याने शेअर्ग विक्री करण्याकरिता संशयित ब्रोकरला फोन करून सांगितले असता त्याने आणखी गुंतवणूक करण्यास सागितले, यानंतर रक्कम परत मिळाल्याने संशय बळावला. अशाचप्रकारे मगर नामक व्यक्तीलाही २० लाख ६७ हजारांना गंडा घातला, पप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष ढवळे तपास करत आहेत.

पेठरोडवरील लिंक रोडची दुरवस्था

लिंक रोड खराब झाल्याने अपघात घडत आहेत. परिसरातील नागरिकांना खड्धांतून मार्गक्रमण करावे लागत असल्याने मोठी गैरसोय होत आहे. अंधारात खङ्गा दिसत नसल्याने दुचाकी आदळून अपघात घडत आहेत. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कचऱ्याचे ढीग, आरोग्य धोक्यात

नाशिक । चौक मंडई परिसरात कचऱ्याचे ढिगारे साधून आहेत. त्यातून उग्र दर्प येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात नियमित स्वच्छता केली जात नसल्याने कचरा पडून राहतो. नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात.

कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

नाशिकरोडला अतिरिक्त सत्र न्यायालय १६ पासून

प्रतिनिधी |नाशिक नाशिकरोड येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आणि दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाचे १६ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. नाशिकरोड येथील न्यायालयाच्या नवीन इमारत येथे या न्यायालयांचे उदघाटन होणार असल्याची माहिती नाशिकरोड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुदाम गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

न्युक्त त्या त. -उद्घाटन सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, पालक न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती जितेंद्र जैन,गात व्हॉल्व्हला याचा अपव्यय

न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन आदी उपस्थित राहणार आहेत. हा उद्घाटन सोहळा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. नाशिकरोडला सध्या कनिष्ठ स्तर न्यायालय असल्याने दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अखत्यारीतील दावे हे नाशिक न्यायालयात दाखल व्हायचे. आता नाशिकरोड न्यायालयाच्या हद्दीतील दिवाणी स्तरावरील ५ लाखांच्या पुढील दावे तसेच अपिले तसेच इगतपुरी, सिन्नर तालुक्यातील जिल्हा स्तरावरील अपिले नाशिकरोड न्यायालयात चालविले जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button