योद्धा न्यूज !! सोलापुर शहरातील विविध विषया संदर्भात उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रिडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्ता मामा भरणे व नगर विकास उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांची आनंद चंदनशिवे यांनी घेतली भेट
प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर योद्धा एक्सप्रेस न्युज

मुंबई : सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विषयासंदर्भात व सोलापूर महानगरपालिका बदली रोजंदारी कामगार यांना कायम करण्यासह अनेक विषया संदर्भात आज मुंबई मंत्रालय या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उप मुख्यमंत्री अजितदादा पवार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आता खासदार सुनील तटकरे, क्रिडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्ता मामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक अध्यक्ष सुरज चव्हाण व नगर विभागाचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर सह श्रीमती शिल्पा कवळे यांची राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी भेट घेऊन चर्चा केली व खालील विषयावर निवेदन सादर केले.
१) सोलापूर शहरातील रमाई आवास योजनेस निधी उपलब्ध होणे.
२) सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील बदली व रोजंदारी कामगारांना कायम सेवेत समाविष्ट करणे.
3) श्री. मार्कडेय सोलापूर सहकारी रुग्णालय येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर शासकीय योजना चालू करणे.
4) सोलापूर शहरातील माता रमाई पुतळा व नॉर्थकोट मैदान सुशोभीकरण करिता निधी उपलब्ध होणे.