सोलापुरात बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण तलावामध्ये पोहून संभाजी ब्रिगेड चे अनोखे आंदोलन
प्रतिनिधी श्री सुमित भांडेकर सोलापूर योद्धा एक्सप्रेस न्यूज

प्रतिनिधी सोलापूर:- संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापुरातील विजापूर रोड जवळ आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव हा सुमारे तीन-चार कोटी खर्च करून बांधलेला होता
गेल्या चार-पाच वर्षापासून तो तलाव बंद आहे त्यामुळे नागरिकांची व जलतरणपटूंची गरज होत असल्याने या रिकाम्या तलावात संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांनी होऊन गांधीगिरी मार्गने आंदोलन केले विजापूर रोड जुळे सोलापूर होडगी रोड परिसरातील नागरिकांना व जलपटून च्या सोयीसाठी सुमारे तीन कोटी खर्चून हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव बांधण्यात आला होता तात्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते 2018 मध्ये उद्घाटन करण्यात आले होते
गेल्या अनेक वर्षापासून हा जलतरण तलाव बंद असल्याने जलतरणपटूंना सराव करता येत नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जेचे मोठे खेळाडू कसे निर्माण होतील नागरिकांच्या कर रूपाने करोडो रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव व अडवेंचर पार्क सारखे वस्तू उभारले जातात पण त्यांची निगा घेतली जात नाही महानगरपालिका प्रशासन जिल्हा क्रीडा अधिकारी विभाग व लोकप्रतिनिधीचे निधीच्या दुर्लक्षामुळे करोड रुपये पाण्यात गेल्यासारखे आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने रिकाम्या तलावात उडी मारून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले
Hotel Grand Rio Nashik