कोल्हापूर शहरक्राईम न्यूजमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य

योद्धा न्यूज :-बेकादेशीर गांजा विक्री करणारे ‌वडगाव पोलीसांच्या ताब्यात

प्रतिनिधी रजनीकांत धोंगडे योद्धा एक्सप्रेस न्युज कोल्हापूर वडगाव

पेठ वडगाव प्रतिनिधी:-दि 8\2\2025 रोजि गोपनिय बातमीचे आधारे सिध्दार्थ नगर पेठ वडगाव येथे बेकायेशीररित्या गांजा या अंमलीपदार्थाची विक्री एक इसम करत आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी वडगाव पोलीस ठाणे कडील पोलीस निरीक्षक महेश चव्हाण पोलीस हवालदार जितेंद्र पाटील आबासो गुंडणके पोलीस अमंलदार अनिल अष्टेकर लखन राज सावंत महेश गायकवाड यांना बातमी मिळाली खातर जमा करून कारवाई करणे बाबत आदेशित केले

नंतर सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून कारवाई करून अमोल उर्फ दादू महादेव मोरे वय वर्ष 35 राहणार सुद्धा नगर पेठ वडगाव निलेश शिवाजी खरपे खरपे वय वर्ष 29 राहणार शिगांव तालुका वाळवा जिल्हा सांगली यास ताब्यात घेऊन गांजाचे झाडाची ओलसर पाने व बिया यांचे लहान बनवलेले लगदे 620 ग्रॅम वजनाचे अमली पदार्थ तसेच मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 23000 2 रुपये मिळून आल्यानंतर सदर इसमांचे विरुद्ध वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कोर्ट पेठ वडगाव यांचे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button