योद्धा न्यूज !! चुकीचे वाहतूक चलन पाठविले गेले? इथे ऑनलाईन करा तक्रार; कोर्टात जायची गरज नाही…
तुम्ही न केलेल्या चुकीचा दंड भरावा लागत असेल तर चिंता करू नका, आम्ही तुम्हाला इथे ती पावती कशी रद्द करावी किंवा भरलेला दंड कसा मागे घ्यावा ते सांगणार आहोत.

प्रतिनिधी श्री प्रकाश दंडगव्हाळ मुख्य संपादक
सध्या वाहतूक विभाग डिजिटल झाला आहे. पूर्वी थांबवून पावती फाडली जायची, मध्यंतरी पोलिसांकडील मोबाईल कॅमेरातून फोटो काढून पावती पाठविली जायची. आता सीसीटीव्ही आणि पोलिसांना दिलेली पावती बनविण्याच्या यंत्रांद्वारे फोटो काढून वाहनचालकांना पावत्या दिल्या जात आहेत. अशावेळी चुकीच्या पावत्यादेखील येत आहेत. दंड ५०० रुपयांपासून ते २ ते ४ हजार रुपयांपर्यंत असल्याने मोठा भुर्दंड वाहन चालकांना बसत आहे. अशावेळी पोलिसांकडे गेल्यास कोर्टात जाऊन रद्द करण्यास सांगितले जाते. परंतू, ऑनलाईन पावतीला ऑनलाईनच आव्हान देता येणार आहे
योद्धा न्यूज !! पुढील सहा दिवस मुंबई-नाशिक महामार्गांवरील कसारा घाट राहणार बंद
तुम्ही न केलेल्या चुकीचा दंड भरावा लागत असेल तर चिंता करू नका, आम्ही तुम्हाला इथे ती पावती कशी रद्द करावी किंवा भरलेला दंड कसा मागे घ्यावा ते सांगणार आहोत.
जर तुमच्या गाडीचे चलन चुकीच्या पद्धतीने केले गेले असेल तर तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला रस्ते परिवाहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या वेबसाईटवर जावे लागणार आहे. morth.nic.in वरे गेल्यावर Grievance च्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. तिथे तु्म्हाला सर्व माहिती द्यावी लागणार आहे. यामध्ये नाव, मोबाईल नंबर आणि चलन नंबर टाकावा लागणार आहे. सर्व माहिती दिल्यानंतर फॉर्म भरावा, यानंतर तुम्ही केलेल्या तक्रारीची चौकशी केली जाईल आणि खरी निघाल्यास चलन रद्द केले जाईल
याशिवाय महाराष्ट्रात या लिंकवर तुम्ही पावतीविरोधात तक्रार नोंदवू शकता… इथे क्लिक करा…
ऑफलाईनही करता येते…तुम्ही ऑफलाईनही तक्रार करू शकता. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तिथे विचारणा करावी. वाहतूक मुख्यालय जिथे असेल तिथे किंवा तिथला कंट्रोल रुम नंबरवर फोन करून तुम्ही तक्रार नोंद करू शकता. अनेकदा पोलीस कोर्टात जाऊन चलन रद्द करण्यास सांगू शकतात.
जातपडताळणीची भिस्त केवळ चार अधिकार्यांवर; राज्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक पद समितीमधील अधिकार्यांची पदे रिक्त
पुणे : राज्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे 36 जिल्ह्यांतील जातपडताळणी समितीमध्ये एक अधिकारी असणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून केवळ चारच अधिकार्यांवर जातपडताळणीची भिस्त असल्यामुळे अनेक नागरिक, विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे प्रलंबित असल्याची बाब पुढे आली आहे.
राज्यात 36 जिल्ह्यांसाठी जातपडताळणी करण्यासाठी समिती असते. या समितीमध्ये महत्त्वाच्या अधिका-यांचे एक पद असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जातपडताळणी समितीचे कामकाज चालते. राज्यात कायमच जातपडताळणीची कामे सुरू असतात. विद्यार्थ्यांना शैक्षणिक, शिष्यवृत्ती व इतर शासकीय कामांसाठी जातपडताळणी प्रमाणपत्रांची गरज असते. काही ठिकाणी तर जातपडताळणी प्रमाणपत्र असेल, तरच प्रवेश मिळतो. ही बाब लक्षात घेता, जातपडताळणी प्रमाणपत्रे लवकरात लवकर देण्यात यावीत, यासाठी समिती कार्यरत असते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून राज्यात केवळ चारच अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे जातपडताळणीची कामे प्रचंड धिम्या गतीने सुरू आहेत. परिणामी, नागरिक तसेच विद्यार्थ्यांची अनेक कामे रखडली आहेत.
राज्यात जूनच्या आसपास बारावीसह इतर शैक्षणिक विभागाचे निकाल लागतात. त्यानंतर खर्या अर्थाने जातपडताळणी प्रमाणपत्रांची गरज लागते. जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर सत्यप्रती संबंधित जिल्ह्याच्या कार्यालयात जमा कराव्या लागतात. सर्व कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर ओरिजनल कागदपत्रे तपासण्यासाठी बोलाविण्यात येते. त्यानंतर कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील, तर ती पुन्हा जमा करण्याबाबत सांगण्यात येते. मात्र, ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर तपासणीसाठी ती पुढे सरकत नाहीत. परिणामी, ही प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब होतो.