नाशिक शहर न्यूजनोकरी विशेषमहाराष्ट्र राज्यमाहिती तंत्रज्ञानराजकीयसामाजिक

योद्धा न्यूज !! नाशिक नवीन न्यायालयात सहा मजली वाहनतळ उभारणार : 44.39 कोटींच्या खर्चास शासन मंजुरी

प्रतिनिधी हरीष चव्हाण नाशिक योद्धा एक्सप्रेस न्युज

नाशिक : जिल्हा न्यायालयाच्या आवारात नवीन वाहनतळाची उभारणी करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालयाच्या परिसरात दिवसेंदिवस वाहनसंख्या वाढत असल्याने पार्किंगसाठी जागा अपुरी पडत आहे. परिणामी, अनेक वाहने ही न्यायालयाबाहेर रस्त्यावरच पार्क होत असल्याने त्यातून वाहतूककोंडीची समस्या सतावत आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी नवीन जिल्हा न्यायालयाच्या आवारात सहा मजली वाहनतळ उभारण्यास शासनाने मंजुरी दिल्याने, भविष्यात वाहतुककोंडीच्या त्रासातून वाहनधारकांची सुटका होणार आहे.

वाहतूक कोंडीतून जिल्हा न्यायालयाची सुटका व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने नवीन जिल्हा न्यायालयाच्या आवारात वाहनतळ उभारणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला होता. या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली असून तळमजला व सहा मजले बांधण्यासाठी एकूण 44 कोटी 39 लाख अंदाजित खर्चास शासनाने मान्यता दिली आहे.

जिल्हा न्यायालयाच्या शेजारी जिल्हाधिकारी कार्यालय, समोर शाळा, बसस्थानके असल्याने या भागात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. संपूर्ण जिल्ह्यातून अभ्यागत याठिकाणी येत असतात. आरोपींना न्यायालयात सादर करण्यासाठी पोलिसांची अनेक वाहने या भागात पार्क करण्यात येतात. त्यामुळे अनेकवेळा वाहने पार्क करण्यासाठी न्यायालय परिसरात जागाच शिल्लक राहत नाही. तेव्हा अनेक वाहनधारक मुख्य रस्त्यालगत वाहने पार्क करतात. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत असते. मात्र आता वाहनतळाचा प्रश्न मिटणार आहे.

असे असेल वाहनतळ

तळमजल्यावर 365 दुचाकी पार्क होऊ शकतील, तर पहिल्या मजल्यावर 24 चारचाकी व 240 दुचाकी, दुसऱ्या ते सहाव्या मजल्यावर प्रत्येकी 76 चारचाकी वाहनांना उभे करता येईल.

मिळवा नोकरी, माहिती, मनोरंजन, बातम्या तसेच महत्वाचे अपडेट सर्वात आधी.

🔑 सरकारी नौकरी🔑

1.) [ECIL] इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2025 एकूण जागा : ४७ अंतिम दिनांक : १० मार्च २०२५

2.) [CBI] सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2025 एकूण जागा : ०५ अंतिम दिनांक : ०८ मार्च २०२५

3.) [HCL] हिंदुस्तान कॉपर लिमिटेड भरती 2025 एकूण जागा : १०३ अंतिम दिनांक : २५ फेब्रुवारी २०२५

4). [NHAI] भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भरती 2025 एकूण जागा : ६० अंतिम दिनांक : २४ फेब्रुवारी २०२५

5). Indian Army Sports Quota Bharti 2025 एकूण जागा : जाहिरात पाहा.अंतिम दिनांक : २८ फेब्रुवारी २०२५

6.) [SIDBI] भारतीय लघुउद्योग विकास बँक भरती 2025 एकूण जागा : ०३ अंतिम दिनांक : २१ मार्च २०२५

7). Bank of Baroda Apprentice Bharti 2025 एकूण जागा : ४००० अंतिम दिनांक : ११ मार्च २०२५

जनावरांमधून माणसामध्ये होतो संसर्ग, चीनला नवा कोरोना व्हायरस सापडला, जगाला धडकी भरवणार

चीनमधील एका टीमला नवा कोरोना व्हायरस सापडलाय. हा नवा व्हायरसचा प्राण्यांमधून माणसांना संसर्ग होण्याचा धोका आहे. हा व्हायरस त्याच मानवी रिसेप्टरचा वापर करतो, जो Covid 19 करत होता. याबाबतचा अभ्यास आणि संशोधन शी झेंगली यांनी केले आहेत. ते कोरोना व्हायरसवरील तिच्या व्यापक संशोधनामुळे “बॅटवुमन” म्हणून देखील ओळखले जातात. वुहान विद्यापीठ आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांसह ते काम करतात.

कोविडच्या उत्पत्तीबद्दल वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या वुहान संस्थेत शि झेंगली काम करत आहेत. वुहान शहरातील प्रयोगशाळेतून कोरोना व्हायरस लीक झाल्याचे आरोपही यापूर्वी झाले होते. कोरोना कोठून आणि कसा आला याबाबत अद्याप ठोस माहिती नसली तरी, काही अभ्यासकांनी हा व्हायरस वटवाघळांमधून आला असल्याचे सांगितले होते. दरम्यान, वुहान इन्स्टिट्यूट कोरोनाच्या उद्रेकासाठी जबाबदार नसल्याचं शी झेंगली यांनी म्हटलंय.

साऊथ चायना मॉर्निंग साऊथ पोस्टच्या अहवालानुसार, संशोधनात म्हटले आहे की नवीन ‘HKU5’ हा नवीन प्रकारचा कोरोनाव्हायरस आहे. हाँगकाँगमधील जपानी पिपिस्ट्रेल वटवाघळांमध्ये हा विषाणू प्रथम आढळला होता. हा व्हायरस मर्बेकोवायरस सबजीन पासून उद्भवतो. यामध्ये मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (एमईआरएस) होणा-या विषाणूचा समावेश आहे. हा विषाणू ACE2 रिसेप्टरशी संबंधित आहे. जो COVID-19 विषाणूद्वारे वापरला जातो. संशोधकांचे म्हणणे आहे की हा विषाणू मानवांमध्ये पसरण्याचा धोका जास्त आहे. मात्र, कोविड 19 प्रमाणे धोकादायक नाही.

संशोधकांच्या मते , आम्ही HKU5-CoV च्या वेगळ्या शोधाचा अहवाल देतो. जो केवळ वटवाघुळांपासून वटवाघळांमध्येच नव्हे तर मानव आणि इतर सस्तन प्राण्यांमध्येही सहज पसरू शकतो. संशोधकांना असे आढळून आले की जेव्हा विषाणूंना नमुन्यांमधून वेगळे केले गेले, तेव्हा ते कृत्रिमरित्या वाढलेल्या पेशी तसेच मानवी पेशींना संक्रमित करतात.

शी झेंगलीच्या टीमला असे आढळले आहे की HKU5-CoV-2 आणि आंतरप्रजाती संसर्गाची शक्यता जास्त असू शकते. अशा परिस्थितीत या विषाणूवर अधिक लक्ष ठेवण्याची गरज आहे. दरम्यान, त्यांच्या टीमने स्पष्ट केले आहे की, त्याची कार्यक्षमता कोविड व्हायरसपेक्षा खूपच कमी आहे आणि HKU5-CoV-2 ला मानवी लोकसंख्येसाठी धोका म्हणून पाहिले जाऊ नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button