योद्धा न्यूज !! पेट्रोल-डिझेल वॅगनमधून उडाला आगीचा भडका, नागपूर रेल्वेस्थानकात भीतीमुळे प्रवाशांची पळापळ
प्रतिनिधी रिजवान शेख नागपूर
प्रतिनिधी नागपूर :- येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या मालगाडीच्या वॅगनमधून अचानक आगीचा भडका उडाला. आगीचे लोळ फलाटावरील शेडला लागल्याने भयंकर स्थिती निर्माण झाली. परिणामी प्रवाशांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती. रविवारी दुपारी ३:४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आरपीएफ आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझविण्यात यश मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
पेट्रोल-डिझेल भरून रतलाम येथून तडाली येथे जाणारी मालगाडी रविवारी दुपारी ३:४५ वाजता फलाट क्रमांक १ आणि २ च्या मध्ये मेनलाइनवर आली. अचानक या गाडीच्या एका वॅगनमधून आगीचा भडका उडाला. क्षणातच आग फलाटच्या शेडपर्यंत पोहोचली. यावेळी तेलंगणा एक्स्प्रेस बाजूच्या फलाटावर उभी होती. आगीचे लोळ पाहून त्या गाडीतील तसेच फलाटावरील प्रवासी भयभीत झाले. काहींना ही आग आपल्याच गाडीला लागल्याचा भास झाला. त्यामुळे तेलंगणातील प्रवाशांनी भराभर गाडीखाली उतरणे सुरू केले. आगीचे रौद्ररूप पाहून फलाटावरील प्रवासीही पळत सुटले. यामुळे रेल्वे स्थानकावर एकच हल्लकल्लोळ निर्माण झाला. दरम्यान, यावेळी कर्तव्यावर असलेले आरपीएफचे जवान, लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धावपळ सुरू केली. एकीकडे स्थानकावर असलेल्या अग्निशमन यंत्राच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केले. दुसरीकडे अग्निशमन विभागाची गाडी बोलाविण्यात आली. तीसुद्धा वेळेत पोहचली. त्यामुळे काही वेळेतच आग नियंत्रणात आली.
मोठा अनर्थ टळला
पेट्रोल-डिझेलच्या टँकरने भरलेल्या मालगाडीला लागलेली आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. कारण अतिज्वलनशील पेट्रोल, डिझेलमुळे आग अनियंत्रित होण्याचा धोका होता. अशात बाजूलाच तेलंगणा एक्स्प्रेसमध्ये आणि स्थानकावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी होते. टँकरने पेट घेतला असता तर स्फोट होऊन मोठी जीवित हानी झाली असती. मात्र, कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला.
मालगाडी अजनी यार्डमध्ये
आग विझविल्यानंतर या मालगाडीला लगेच अजनी यार्डमध्ये नेण्यात आले. तेथे इंडियन ऑइल आणि अग्निशमन विभागाच्या पथकाकडून गाडीच्या सर्वच्या सर्व वॅगनची तपासणी करण्यात आली. दुसरीकडे तेलंगणा एक्स्प्रेस तातडीने स्थानकावरून दिल्ली मार्गाने रवाना करण्यात आली.
आगीच्या कारणांचा शोध सुरू
आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चौकशी सुरू आहे, असे अधिकारी म्हणतात. लवकरच आगीचे कारणही स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
योद्धा न्यूज !! पेट्रोल-डिझेल वॅगनमधून उडाला आगीचा भडका, नागपूर रेल्वेस्थानकात भीतीमुळे प्रवाशांची पळाप
नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील कोतवालबर्डी शिवारात स्थित एशियन फायर वर्क्स कंपनीत रविवारी दुपारी 2 वाजता भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत मध्य प्रदेशातील दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.


मृत्यू झालेल्या कामगारांमध्ये मध्य प्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील बिलमा येथील भुरा लक्ष्मण रजत (25) आणि घुगरी मांडला येथील मुनीम मडावी (२९) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये काटोल तालुक्यातील डोरली (भिंगारे) येथील सौरभ लक्ष्मण मुसळे (25), घनश्याम लोखंडे (35) आणि कळमेश्वर तालुक्यातील राऊळगाव येथील सोहेल उर्फ शिफान शेख (25) यांचा समावेश आहे.
50 कामगारांची क्षमता असलेल्या या कंपनीत स्फोटाच्या वेळी एका युनिटमध्ये सात कामगार कार्यरत होते. दुपारच्या जेवणाच्या वेळेमुळे दोन कामगार घरी गेले होते आणि एक बाहेर गेला होता. उर्वरित पाच कामगार युनिटजवळ असताना हा स्फोट झाला. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
नागपूर ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत. गेल्या काही वर्षांत नागपूर परिसरात अशा प्रकारचे अनेक स्फोट झाले आहेत. नुकताच मध्ये भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू, 2016 मध्ये पुलगाव येथील दारूगोळा डेपोत 17 जणांचा मृत्यू आणि 2024 मध्ये धामना येथील स्फोटक कंपनीत 6 जणांचा मृत्यू झाला होता.
अंघोळ घालताना बादलीत पडल्याने चिमुरड्याचा मृत्यू भंडाऱ्याच्या पालगाव येथील दुर्दैवी घटना
प्रतिनिधी । भंडारा
पालगाव येथे अंघोळ घालताना बादलीत पडल्यामुळे दीड वर्षीय बाळाचा मृत्यू झाला. या बाळाचे नाव अथर्व राहुल बावणकर (दीड वर्ष) असे होते. पालगाव येथे शनिवारी दुपारी आजी बाळाला अंघोळ घालत असता तो पाणी असलेल्या प्लास्टिकच्या बादलीत पडून बुडाला. आजीने बाहेर काढेपर्यंत तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला उपचाराकरिता तातडीने सामान्य रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी तपासून बाळाला मृत घोषित केले. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
भंडाऱ्यात दुचाकीच्या धडकेत
तरुणाचा मृत्यू : कांद्री येथे दुचाकीने धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू झाला. मृताचे नाव रमेश जयदेव टेकाम (४०) असे आहे. कांद्री येथे रमेश टेकाम हा शनिवारी रस्ता ओलांडत होता. त्या वेळी रामटेककडून भरधाव आलेल्या दुचाकीने त्याला धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने रमेशचा मृत्यू झाला. तसेच दुचाकीचालक जखमी झाला. आंधळगाव पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर वाहतुकीला शिस्त लावण्याची मागणी आहे. नागरिकाकडून होत
शेजाऱ्याच्या मोबाइलमध्ये गुगल पे डाऊनलोड करत लांबवले ६५ हजार भंडाऱ्याची घटना, पत्नीसह स्वतःच्या खात्यात पैसे केले हस्तांतरित
प्रतिनिधी । भंडारा
शेजाऱ्याच्या मोबाइलमध्ये गुगल पे अॅप डाऊनलोड करून त्याच्या बैंक खात्यातील ६५ हजार रुपये पत्नीसह स्वतःच्या खात्यात हस्तांतरित केल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील पालांदूरच्या खराशी येथे उघडकीस आली. आरोपी चेतन विनायक शेंडे (३१) असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,
खराशी येथील तक्रारदार
संगणक बुद्धघोष कन्हैयालाल मेश्राम यांच्या खात्यावर करणाऱ्या त्यांचा भाचा अतुल खोब्रागडे याने सातबाऱ्यावर . साईश धान टाकले. धानाचा चुकारा झाला असल्याने कॉलनी बुद्धघोषच्या अकाउंटवर ७७ हजार २८० याबाबत रुपये आले, बुद्धघोषच्या अकाउंटवर एवढे तरुणी पैसे आल्याचे समजल्याने चेतनने बुद्धघोषचा आहे. मोबाइल चोरण्याचा बेत आखत ७ फेब्रुवारीला साईश मोबाइल चोरला. मोबाइल हरवला म्हणून त्सुक बुद्धघोष फोन लावत होते. तेव्हा त्यांच्या
मोबाइलवर रिंग जात होती. मात्र, फोन
हितेश मेहताविरोधात गुन्हा दाखल करण्यात
को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना मुंबईत झाली. ५७वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या बँकेचे मुख्यालय मुंबईत आहे. स्थापनेपासूनच ही बैंक देशातील विविध राज्यांमध्ये शाखांचे जाळे असलेली
बँक स्टेटमेंटमध्ये प्रकार उघडकीस बैंक स्टेटमेंट काढल्यानंतर यात सत्य
उघडकीस आले. चेतन शेंडेने मोबाइल चोरल्यानंतर पालांदूर येथील एका हटिलात ५०० रुपये हस्तांतरित केले व त्याच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर बस प्रवासात तिकीटही ऑनलाइन काढले. काही हस्तांतर नागपूर येथे केले केले. चेतनने बुद्धघोषच्या खात्यावरील ६५ हजार रुपये लंपास केले. त्याने सर्व हस्तांतरण चोरलेल्या मोबाइलनेच केल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले.
कुणीही उचलत नव्हते. विशेष म्हणजे तेव्हा आरोपीसुद्धा बुद्धघोषचा हरवलेला फोन शोधू लागण्यास हातभार लावत होता. एवढेच नाहीतर खुद्द आरोपी बुद्धघोष सोबत पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मोबाइल हरवल्याची तक्रार करण्यासाठी गेला. नंतर खात्यावरील धानाचे पैसे काढण्यासाठी आरोपी व बुद्धघोष बँकेत गेले, तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी तुमचे पैसे गुगल पेने इतरत्र वळवले आहेत, असे सांगितल्यानंतर प्रकार उघडकीस आला.