योद्धा न्यूज ! RSP Film Production च्या निर्मात्या मा. रेखाताई मंजुळकर यांच्या पुढाकाराने जेष्ठ अभिनेते राजेंद्रजी जाधव सर यांना आमंत्रित
प्रतिनिधी प्रकाश दंडगव्हाळ मुख्य संपादक

प्रतिनिधी नाशिक योद्धा न्यूज :- आज सांगताना खुप आनंद होतोय कि सर्वत्र गाजणारा युट्युब वरील चैनल म्हणजे RSP Film Production निर्मित ” खळबळ ” या चैनल ची नुकतीच एक बैठक नासिक येथे पार पडली यात बहुसंख्येने कलावंत हजर होते या बैठकीसाठी RSP Film Production च्या निर्मात्या मा. रेखाताई मंजुळकर यांच्या पुढाकाराने जेष्ठ अभिनेते राजेंद्रजी जाधव सर यांना आमंत्रित करून कॅमेऱ्या समोरील वावर व शुटींग च्या सेट वर कलाकारांना येणाऱ्या अडचनी विषयी खुप छान प्रकारे मार्गदर्शन देण्यात आले.
खळबळ या चैनल वरील नव-नाविन एपिसोड बघून खळबळ या परिवारात चित्रपट क्षेत्रात व टी.व्ही मालिकेत आपल्या अभिनयाचा शिक्का मोर्तब केलेले जेष्ठअभिनेते मा.राजेंद्रजी जाधव सर हे मार्गदर्शना साठी उपस्थित होते व त्यांनी बोलताना मी सुद्धा आपल्या खळबळ परिवारात सहभाग घेत आहे . असे उद्गार काढले ते पुढे बोलताना म्हणाले आपण सर्व मिळून खळबळ चैनल वर सोबत आपली कला सादर करूया व देशभरात खळबळ गाजवूया असे विचार सरांनी बोलून दाखवले . यावेळी निर्मात्या रेखाताई मंजुळकर यांनी प्रमुख पाहुणे जेष्ठ अभिनेते राजेंद्रजी जाधव सर यांचा पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देवून सत्कार केला तसेच भगवान देवकर ( अभिनेता / लेखक / दिग्दर्शक ) यांनी आलेल्या सर्व कलावंताचे आभार व्यक्त केले व हेमंत कुलकर्णी ( लाईन प्रोड्युसर ) यांनी कार्यक्रमाचे अनुमोदन केले तसेच उषा देवकर (कार्यकारी निर्माता ) प्रियंका पाटील (अभिनेत्री ) रोहिदास नेरकर ( अभिनेता ) व अनेक पोलिस मित्र संघटनेचे पदाधिकारी सह बहुसंख्य कलावंत उपस्थित होते लवकरच आपल्या PSP Film Production चा अर्थात खळबळ युट्युब चैनल चा पहिला वर्धापण दिन साजरा करण्यात येणार आहे .
या कार्यक्रमात खळबळ चैनल चे टाईटल साँग नव्याने लाँच करण्यात येणार आहे . इतकेच नाहीत तर दिग्गज असलेले जेष्ठ अभिनेते राजेंद्र जाधव सरांच्या हस्ते अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा व उत्कृष्ठ कामगिरी बजावली आहे असे कलावंत व टेक्निकल सहकारी व सामाजिक कार्यात मोलाची कामगीरी बजावली आहे अशा मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे मा. रेखाताई मंजुळकर (निर्माता ) व भगवान गि. देवकर यांनी कार्यक्रमा संदर्भात माहिती दिली . सर्व प्रेक्षक मायबाप आजपर्यंत आपण खळबळ परिवारावर जे प्रेम केले ते सदोदित करत रहावे व आपल्या मित्र परिवाराला ही आपल्या खळबळ युट्युब चैनल ला सबस्क्राईब करून प्रत्येक एपिसोड बघून लाईक करावे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहेत त्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात धन्यवाद .