अपरिचित इतिहासआर्थिक घडामोडीउद्योग विश्वमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यसामाजिक
Trending

योद्धा न्यूज !! संघर्षमय कहाणी ! गेल्या १० वर्षांपासून दाम्पत्याने ट्रकमध्येच थाटला संसार, पत्नी सुद्धा ट्रक चालविण्यासाठी करते मदत

प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

बुलढाणा जिल्हा :- संघर्षमय कहाणी ! गेल्या १० वर्षांपासून दाम्पत्याने ट्रकमध्येच थाटला संसार, पत्नी सुद्धा ट्रक चालविण्यासाठी करते मदत सिंदखेड राजा तालुक्यातील जनुना गावचे रहिवासी असलेले एकनाथ तुकाराम पवार आणि त्यांची पत्नी ललिता पवार यांनी ट्रकमध्येच आपला संसार मांडला आहे. हे दाम्पत्य गेल्या १० वर्षांपासून आपल्या कुटुंबासह ट्रकमधून प्रवास करीत आहे. त्यांना तीन मुली असून एक ७ वर्षाची आणि दुसरी ५ वर्षांची मुलगी त्यांच्यासोबत ट्रकमध्ये राहतात. तिसरी ९ वर्षाची मोठी मुलगी गावात राहते.

आर्थिक परिस्थितीमुळे दैनंदिन गरजा पूर्ण होत नसल्यामुळे पत्नीचा हातभार लागावा, यासाठी सोबतच राहत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे पत्नी सुद्धा ट्रक चालविण्यासाठी मदत करते. वडधामना येथे पवार कुटुंब आपल्या मुलींना घेऊन ट्रक भरण्यासाठी आले असता ही संघर्षमय कहाणी समोर आली. आपल्या संसारासाठी हे कुटुंब पुणे ते नागपूर दरम्यान मालाची वाहतूक करतात. अनेक वेळा दोन वेळच्या जेवणाची सुद्धा सोय होत नसल्याचे पवार कुटुंबाचे म्हणणे आहे.

२०२३ मध्ये त्यांनी महिंद्रा कंपनीचा कर्ज काढून ट्रक विकत घेतला. ट्रकमधील तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा ट्रक रस्त्यात उभा करावा लागत आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या साधनावरही परिणाम होतो. मात्र कंपनीकडून त्यांना कोणतेही सहकार्य मिळाले नसल्याची माहिती एकनाथ पवार यांनी दिली. ट्रकचे कर्ज फेडण्यासाठी महिन्याला ६८ हजार ५०० रुपयांचा हप्ता भरावा लागतो. इतके उत्पन्न मिळत नसल्यामुळे कुटुंबाला पैसे देऊ शकत नाही त्यामुळे कुटुंबच सोबत ठेवल्यामुळे पैशाची बचत होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

एकनाथ पवार सांगतात की, कधी कधी त्याच्यावर इतका मानसिक दबाव येतो की ते आत्महत्या करण्याचा विचारही करतात. त्यांची पत्नी ललिता पवार याही ट्रक चालवण्यात त्यांना साथ देतात. याशिवाय ती मुलींना अभ्यासासाठी प्रेरित करते. मात्र रस्त्यावर राहून मुलींना शिक्षण देणे आणि त्यांचे योग्य संगोपन करणे ही आव्हाने वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button