योद्धा न्यूज !! संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती
प्रतिनिधी श्री समीर सनदी योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी समीर सनदी
संतोष देशमुख हत्याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे.
देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थांतर्फे संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती. अखेर उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एक्स’ अकाऊंटवर ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी निकम यांच्या नियुक्तीवर भाष्य केले आहे. आमची एक मागणी पूर्ण झाली आहे. बाकीच्या ६ मागण्या पूर्ण झाल्यावर अन्नत्याग आंदोलन आम्ही स्थगित करू, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, फडणवीस आणि निकम यांच्यात अडीच महिन्यांपूर्वी भेट झाली होती. निकम यांची नियुक्ती होईल, असे बोलले जात होते. धनंजय देशमुख यांना निकम हे वकील म्हणून पाहिजे होते. धनंजय देशमुख यांना निकम यांच्यावर विश्वास आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी सुरू होती. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा हीच मागणी केली होती. भाजप आमदार सुरेश धस यांनीही ही मागणी लावून धरली होती. याच मागणीसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांनी दोन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
𝗖𝗵𝗮𝗻𝗻𝗲𝗹 𝗟𝗶𝗻𝗸
👇
https://whatsapp.com/channel/0029VayuIDSAzNc0lgw8Wx15
फुकट्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेचा ‘थंडगार झटका’, 1.72 कोटींची दंडवसुली
विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेने तब्बल 1.72 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. मुंबई एसी लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कने तिकीट तपासणी मोहीम तीव्र केली आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून वसूल होणाऱ्या दंडात लक्षणीय वाढ झाली आहे.
51,600 हून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मुंबई उपनगरीय विभागात दररोज 109 एसी लोकल सेवा चालवल्या जातात. ज्यातून अंदाजे 1.26 लाख प्रवासी प्रवास करतात. चालू आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये (जानेवारी 2025 पर्यंत) मुंबई विभागाच्या तिकीट तपासणी पथकांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या 51,600 हून अधिक प्रवाशांवर कारवाई करत त्यांच्याकडून 1.72 कोटी रुपये दंड वसूल केला.
यातच फक्त जानेवारी 2025 मध्येच पश्चिम रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या 6,258 प्रवाशांवर कारवाई करत 20.97 लाख रुपये दंड वसूल केला करण्यात आला. जो जानेवारी 2024 च्या तुलनेत 31 टक्के वाढ जास्त आहे.
पश्चिम रेल्वेने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, प्रवाशांचा प्रवास अनुभव अधिक सुधारण्यासाठी आणि तिकीटविरहित प्रवास रोखण्यासाठी, पश्चिम रेल्वेने अनेक प्रमुख उपक्रम राबवले आहेत. ज्यात उपनगरीय लोकल्समधील विनातिकीट प्रवासकऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष एसी टास्क फोर्स बनवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त प्रवासी एसी लोकल ट्रेनबाबत कोणतीही तक्रार असल्यास 24×7 तक्रारी हेल्पलाइन क्रमांक 139 किंवा 9004497364 वर व्हॉट्सअॅपद्वारे तक्रार करू शकतात. ज्यावर रेल्वे अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाई केली जाईल.