योद्धा न्यूज !! श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडाचे काम ३ महिन्यांत पूर्ण करा !
प्रतिनिधी समीर सनदी महाराष्ट्र मेडिया अध्यक्ष

कोल्हापूर – श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या परिसरात असलेले मनकर्णिका कुंड खुले होण्यासाठी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने पत्रकार परिषद, निवेदन, आंदोलन याद्वारे आवाज उठवला होता. अत्यंत खेदाची गोष्ट म्हणजे अत्यंत पवित्र अशा या या कुंडावर शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते. देवी भक्तांच्या उद्रेकातून या शौचालयाचे अनधिकृत बांधकाम जून २०१६ मध्ये पाडण्यात आले. यानंतर वर्ष २०२१ मध्ये हे कुंड खुले करण्याचे काम चालू करण्यात आले. ४ वर्षांनंतरही या कुंडाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तरी पुढील ३ महिन्यात कुंडाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समिती, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी निवेदनाद्वारे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे केली. कुंडाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी शिष्टमंडळाने पहाणी केली. त्यानंतर ही मागणी करण्यात आली. याच समवेत शिष्टमंडळाने श्री महालक्ष्मी मंदिर आणि देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अन्य प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली.
निवेदन स्वीकारल्यावर शिवराज नाईकवाडे म्हणाले, ‘‘मनकर्णिका कुंडाच्या सुशोभिकरणाचे काम आम्ही गतीने करत असून हे काम ३ मांसात आम्ही पूर्ण करू, तसेच भाविकांना चांगल्या सुविधा देऊ.’’
‘मनकर्णिका कुंड’ हे प्राचीन काळापासूनच श्री महालक्ष्मी शक्तीपिठावर असून लक्षावधी भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. करवीर महात्म्यामध्ये या कुंडाचे वर्णन आले आहे. अगस्ती ऋषी आणि त्यांची पत्नी लोपामुद्रा यांनी या कुंडात अनेक वेळा स्नान केले आहे. पूर्वी या तिर्थातील पवित्र पाणी श्री महालक्ष्मी देवीच्या अभिषेकासाठी वापरले जात असे. तरी हे कुंड लवकरात लवकर खुले करून येणार्या भाविकांनी त्याची पूर्ण माहिती होण्यासाठी मनकर्णिका कुंडांवर त्यांचे धार्मिक महत्व दर्शवणारे माहितीचे फलक आणि त्याची छायाचित्रे लावावीत, अशीही मागणी या प्रसंगी करण्यात आली.
या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक श्री. सुनील घनवट, श्री. शिवानंद स्वामी, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील, हिंदू महासभा जिल्हाध्यक्ष श्री. राजू तोरस्कर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव, हिंदु महासभेचे श्री. मनोहर सोरप, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे सर्वश्री आनंदराव पवळ, अमर जाधव, शरद माळी, मराठा तितुका मेळवावाचे श्री. योगेश केरकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव उपस्थित होते.
आपला नम्र,
श्री. शिवानंद स्वामी, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्रमांक : 70207 10460)
श्री. अभिजित पाटील, संयोजक, मंदिर महासंघ, कोल्हापूर ( संपर्क – 878 808 9889 )
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ‘छावा’चं कौतुक, विकी कौशल म्हणाला – “शब्दांच्या पलिकडचा सन्मान..”
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट ‘छावा’ (Chhaava Movie) १४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसांपासूनच दमदार कमाई करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटात विकी कौशल(Vicky Kaushal)ने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna)ने महाराणी येसूबाई यांची भूमिका निभावली आहे. या चित्रपटाचे सर्वत्र खूप कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्यांनी केलेली प्रशंसा ऐकल्यावर विकी कौशलने पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
विकी कौशल आणि रश्मिका मंदानाच्या छावा चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. गोवा आणि मध्यप्रदेश सरकारने हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे. या चित्रपटाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूप कौतुक केले आहे. त्यानंतर विकी कौशलने नरेंद्र मोदींचा व्हिडीओ इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत. विकी कौशलने लिहिले की, शब्दांच्या पलीकडे आदर! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार.
मॅडॉक फिल्म्सने पंतप्रधानांचे मानले आभार
तसेच मॅडॉक फिल्म्सनेही पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. इंस्टाग्रामवर एका पोस्टसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘एक ऐतिहासिक सन्मान! पंतप्रधान मोदींनी ‘छावा’चे कौतुक करून छत्रपती संभाजी महाराजांच्या त्याग आणि वारशाचा गौरव केल्याने हा मोठा अभिमानाचा क्षण आहे. हा क्षण आपल्याला कृतज्ञतेने भरुन टाकतो. मॅडॉक फिल्म्स, दिनेश विजन, लक्ष्मण उतेकर, विकी कौशल आणि चित्रपटाची संपूर्ण टीम या विशेष उल्लेखाने भारावून गेली आहे.
‘छावा’च्या कौतुकात नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नवी दिल्लीत ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाचे कौतुक केले. या चित्रपटाबाबत देशभरात सुरू असलेल्या चर्चेवर पंतप्रधान म्हणाले, ‘सध्या सर्वत्र ‘छावा’ची धूम आहे.’ नरेंद्र मोदी म्हणाले, ‘महाराष्ट्र आणि मुंबईने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांनाही नवी उंची दिली आहे. सध्या सगळीकडे छावाची धूम पाहायला मिळत आहे. शिवाजी सावंत यांच्या मराठी कादंबरीत संभाजी महाराजांच्या शौर्याचा परिचय याच रूपाने होतो.