महाराष्ट्र राज्यराजकीयसोलापूर शहर

योद्धा न्यूज!! सोलापुर महानगरपालिकेचे नुतन आयुक्त डॉ सचिन ओम्बासे साहेब यांच्या सत्कार

प्रतिनिधी सुमित भांडेकर सोलापूर योद्धा एक्सप्रेस न्यूज

प्रतिनिधी सोलापूर :- सोलापुर महानगरपालिकेचे नुतन आयुक्त डॉ सचिन ओम्बासे साहेब यांच्या सत्कार मलेरिया विभागाच्या वतीने अध्यक्ष दिलावर मनियार यांच्या हस्ते करण्यात आले

त्यावेळी सहाय्यक आयुक्त संदिप कारंजे साहेब अतिरिक्त आयुक्त रवीजी पवार साहेब मलेरिया विभागाचे SFW सादिक शेख श्रीनिवास कोंडा सुभाष सुरवसे सलाऊद्दीन आबादीराजे वैभव शिवशरण परमेश्वर कसबे दत्ता शिंगे सिध्देश्वर सावंत विष्णु भालेराव युवराज बनसोडे तिमय्या भैरे आंजन गोन्याल भिमराव रोकडे नितीन तळभडारे अख्तर हुसेन शेख आदी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…

महाकुंभच्या सुरक्षाव्यवस्थेत प्रथमच ‘एआय’

गंगा आपली मर्यादा कधी सोडत नाही. काठ सोडून बाहेर पडत नाही. आणि म्हणून गंगेच्या काठावरची शहरे, अगणित गावे सुखेनैव नांदतात आणि त्याच गंगेच्या कुशीत शांत झोपी जातात. माणसांचे तसे नाही.

माणसे सदैव मर्यादा सोडूनच वागत असल्याने प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात केवळ मानवी सुरक्षेवर विसंबून चालणार नव्हते. कदाचित म्हणूनच थेट एआयला म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेलाच इथे तैनात करावे लागले. एआय सुरक्षा लाभलेला हा इतिहासातील पहिला विराट धार्मिक आध्यात्मिक सोहळा ठरला आहे.

गंगेचे आणि त्यातही तीर्थराज प्रयागराजच्या त्रिवेणीचे पाणी शुद्ध की अशुद्ध ही चर्चा अनपेक्षित नाही. मात्र रोज लाखो भाविक जिथे डुबकी मारत आहेत त्या गंगेच्या, यमुनेच्या, लुप्त सरस्वतीच्या म्हणजेच त्रिवेणीच्या पाण्यात एक ना अनेक एआय कॅमेरे आपल्यावर नजर ठेवून आहेत हे कुणाच्याही गावी नाही. मकरसंक्रांतीला सुरू झालेल्या या महाकुंभ मेळ्यात अखेरच्या दिवसापर्यंत किमान 45 कोटी भाविक पवित्र स्नान करतील हा सुरुवातीचा अंदाज होता. तो आता मागे पडला आणि महाशिवरात्रीचे शाहीस्नान बाकी असताना ही संख्या आता 58 कोटींवर पोचली आहे.

चार हजार हेक्टर पसरलेल्या कुंभनगरीत इतक्या प्रचंड संख्येच्या भक्तसागराला सुरक्षा देण्यासाठी मग मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी सरकारच्या प्रशासनाला आणखी एक कुंभ हाती घ्यावा लागला. त्याचे नाव – डिजिटल कुंभ !

पारंपरिक पद्धतीने गर्दीचे अंदाज न बांधता महाकुंभला रोज येणारी गर्दी मोजण्याची जबाबदारी कृत्रिम बुद्धिमत्तेवर- एआय वर टाकण्यात आली.

अर्न्स्ट अँड यंग या जगप्रसिद्ध कंपनीला हे काम देण्यात आले. महाकुंभ नगरीत मैदानावर, घाटाघाटांवर, प्रयागराजमध्ये दाखल होणार्‍या आणि बाहेर पडणार्‍या रस्त्यांवर अशा सर्व ठिकाणी बसवलेले एआय कॅमेरे मिनिटामिनिटाला दाखल होणार्‍या गर्दीचा अंदाज या कंट्रोल सेंटरला देते. सेंटरचे चारशे कर्मचारी सतत या 500 हून अधिक एआय कॅमेर्‍यांकडून येणारी माहिती आणि 2750 सीसीटीव्हींचे थेट प्रक्षेपण अभ्यासतात आणि त्यानुसार बंदोबस्त कमी अधिक केला जातो.

पुरेसे उत्पन्न असलेल्या विभक्त पत्नीला अंतरिम पोटगी नाहीच

प्रतिनिधी नाशिक:-   नोकरी आणि व्यवसायाच्या माध्यमातून पत्नीला पुरेसे उत्पन्न मिळत असेल तर कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात तिला अंतरिम पोटगी मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे. विभक्त पतीकडून अंतरिम पोटगी मागत महिलेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. न्यायालयाने तिला अंतरिम पोटगी मंजूर करण्यास नकार दिला. तथापि, तिच्या अल्पवयीन मुलीला दरमहा १० हजार रुपयांचा देखभाल खर्च देण्याचे आदेश पतीला दिले.

अंतरिम पोटगीची मागणी करत महिलेने दाखल केलेल्या अर्जाला आक्षेप घेत पतीसह सासू-सासऱ्यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. अर्जदार महिलेने तिच्या उत्पन्नाबाबतची वस्तुस्थिती कोर्टापासून लपवली आहे, असा दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला. अर्जदार महिला उच्चशिक्षित आहे. ती स्वतःचा व्यवसाय चालवत असून त्या ठिकाणी जवळपास २० कर्मचारी काम करीत आहेत. या व्यवसायापासून दर महिन्याला तीन लाख ते चार लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. अशा स्थितीत तिला पोटगी मागण्याचा हक्क नाही, असा दावाही प्रतिज्ञापत्राद्वारे करण्यात आला. अर्जदार महिलेला एक मुलगी असून तिची जबाबदारी मात्र पती आणि पत्नी अशा दोघांची आहे. सध्या मुलगी आईकडे राहात आहे. त्यामुळे पिता या नात्याने मुलीला दरमहा दहा हजार रुपये देखभाल खर्च देण्याचे आदेश न्यायालयाने पतीला दिले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button