योद्धा न्यूज!! सर्व एस.टी. बसेसमध्ये जी.पी.एस. आणि सी.सी.टी.व्ही. बसवण्याचे निर्देश”पुण्यातील घटनेनंतर सरकारचा मोठा निर्णय
प्रतिनिधी पुणे वैभव सूर्यवंशी

प्रतिनिधी पुणे:- पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दरम्यान या प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असून त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षिस जाही करण्यात आले आहे
योद्धा न्यूज !! स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार, पुणे हादरलं
पुण्यात घडलेल्या या घटनेनंतर एस.टी. प्रवास करताना महिलांच्या सुरक्षिततेबाबत मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून
महिला प्रवाशांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशात महिला प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात एस.टी महामंडळाची महत्त्वाची बैठक मंत्रालय येथे पार पडली
या बैठकीनंतर महिला प्रवशांच्या सुरक्षितेसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही. आणि जी.पी.एस. यंत्रणा बसवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे आता सर्व बसेसमध्ये
सी.सी.टी.व्ही.जी.पी.एस. अनिवार्य
मंत्रालयात एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी ते म्हणाले, “आमच्या सर्व लाडक्या बहिणींना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो की,
घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.महाराष्ट्रात कुठेच अशी घटना घडता कामा नये.लाडक्या बहिनींना परिवहन मंत्री म्हणून माझी विनंती आहे की,तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने एस.टी. प्रवास करत होता तसाच तुमचा प्रवास सुरू ठेवा.
प्रवाशांच्या सुरक्षतेसाठी आम्ही बैठकीत सर्व बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि जी.पी.एस. ट्रॅकिंग सिस्टम बसवण्याचे निर्देश दिले आहेत.
याचबरोबर पुढील काळात एस.टी. बसेस आणि स्थानकांवर ए.आय.चा वापरही करण्यात येणार आहे.”
बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे
- सर्व बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही., जी.पी.एस. अनिवार्य करणार
- सुरक्षा रक्षकांमध्ये महिलांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार
- सर्व बस डेपोचे ऑडिट करण्यात येणार
- परिवहन विभागात आय.पी.एस. अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय
- एस.टी. आगारातील भंगार वाहने १५ एप्रिल २०२५ पर्यंत हटवण्यात येणार
- शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल
- बस डेपोत स्वच्छतेला प्राधान्य देणार
आरोपी अद्यापही फरार
पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोप आरोपी
दत्तात्रेय रामदास गाडे (३५) याचा पोलीसांकडून शोध सुरू आहे.त्याला शोधण्यासाठी पुणे पोलीसांनी १३ पथकांची स्थापना केली आहे.सकाळी घडलेल्या घटनेपासून तो फरार आहे.याचबरोबर त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्याला १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची माहिती,
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पी.टी.आय.ला दिली आहे.
बसमधील आत्याचार प्रकरण
आराेपी दत्तात्रय रामदास गाडे कोण आहे?
घटने प्रसंगी ताे चाेरी प्रकरणात जामीनवर बाहेर आलता…पुण्यातील स्वारगेट या अत्यंत गजबजलेल्या एस.टी. स्थानकात पहाटे साडेपाचच्या सुमारास शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला.हे बलात्कार प्रकरण सकाळी उजेडात आल्यानंतर विरोधक विविध संघटना, सामान्य माणसं आणि महिला कार्यकर्त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले
सी.सी.टी.व्ही. फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटली आहे.
त्याच्या शोधासाठी पुणे पोलीसांनी १३ पोलीस पथके तैनात केली आहेत.तसंच, त्याला शोधून देणाऱ्याला १ लाखांचं बक्षिसही जाहीर करण्यात आलं आहे.दरम्यान, हा आरोपी नक्की कोण?त्याची पार्श्वभूमी काय? हे जाणून घेऊयात.सी.सी.टी.व्ही. फुटेज आणि पिडित तरुणीने केलेल्या वर्णनानुसार पोलीसांनी आरोपीची ओळख पटवली आहे.
त्याचं नाव दत्तात्रय रामदास गाडे (३५) आहे.तो पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट येथे राहणारा आहे.
त्याच्याविरोधात स्वारगेट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडे विरोधात पुणे आणि अहिल्यानगर पोलीस ठाण्यात अर्ध्या डझनहून अधिक चोरीचे गुन्हे दाखल आहेत.सोनसाखळी चोरीचेही प्रकरण त्याच्यावर नोंद आहेत.२०१९ मध्ये तो एका चोरीच्या प्रकरणातून तुरुंगातून जामिनावर सुटला आहे.तसंच, २०२४ मध्येही पुण्यात त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता.”आरोपी गाडे चा स्वारगेट एसटी स्थानकावर सतत वावर असायचा.तसंच, तो एका पक्षातील आमदाराचा कार्यकर्ता असल्याचीही बाब पुढे आली आहे.
दरम्यान, त्याच्या शोधासाठी पोलीसांनी १३ पथके तैनात केली असून त्याच्या आई-वडिल आणि भावाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.तर, त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेऊन तिचीही चौकशी करण्यात आली.तसंच, त्याच्या १० मित्रांचीही चौकशी करण्यात आली आहे.या चौकशीच्या आधारे पोलीस त्याच्या मागावर आहेत.
आरोपीच्या मैत्रिणीची चौकशी,आई-वडिलांनाही घेतलं ताब्यात;पुणे बलात्कार प्रकरणात पोलीस ॲक्शन मोडवर
मैत्रिणीच्या चौकशीतून काय निष्पन्न झालं?
गाडेची मैत्रीण भोर तालुक्यात राहायला आहे.पोलीसांनी तिची चौकशी केली.
चौकशीत गाडेने मैत्रिणीकडे तिच्या संपर्कात असलेल्या मैत्रिणींचे मोबाइल क्रमांक मागितले होते.
त्यांनाही त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती चौकशीत मिळाली आहे.गाडे ने आणखी काही तरुणींना त्रास दिल्याचा संशय पोलीसांना आहे.त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.एस.टी. बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी आरोपी गाडे चा स्वारगेट एस.टी. स्थानकात वावर असायचा.सकाळी परगावी निघालेल्या तरुणीकडे त्याने एस.टी.तील वाहक असल्याची बतावणी केली आहे.
ज्या बसमध्ये गाडे ने तरुणीवर बलात्कार केला.
त्या बसची न्यायवैद्यकीय तज्ज्ञांकडून (फाॅरेन्सिक एक्सपर्ट) तपासणी करण्यात येणार आहे.एस.टी. बस न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली आहे.संबंधित बसचालकाचा पोलीसांकडून जबाब नोंदविण्यात आला आहे.