आर्थिक घडामोडीउद्योग विश्वउल्हासनगरमहाराष्ट्र राज्य

योद्धा न्यूज !! उल्हासनगरातील महिला बचत गटाना ५० लोखंडी स्टॉल१५०० महिला बचत गटा पैकी ५० गट ठरणार पात्र

प्रतिनिधी उल्हासनगर सिद्धार्थ पवार

महापालिकेने महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी तब्बल ५० लोखंडी स्टॉल खरेदी केले. एकूण १५०० महिला बचत गटा पैकी ५० पात्र गटाला स्टॉलचे वाटप होणार आहे. त्यामध्ये बचत गटातील महिला व्यवसाय सुरु करणार आहेत.

उल्हासनगर महापालिका महिला बाल विकास विभागाच्या वतीने महिला बचत गटांना आठ बाय आठ आकाराचे एकूण ५० लोखंडी स्टॉल देण्यात येणार आहे. त्या एका स्टॉलची किंमत २ लाख ४८ हजार ३१५ असून ५० स्टॉल १ कोटी २४ लाख १५ हजार ७५० रुपयाला खरेदी केले. स्टॉलसाठी आतापर्यंत ५२ अर्ज विभागाकडे आल्याची माहिती विभाग प्रमुख नितेश रंगारी यांनी दिली. या महिला बचत गटाना उद्योग व्यवसायसाठी राज्य, केंद्र व महापालिकेच्या वतीने विविध प्रकारे मदत केली जाणार असून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल. महिला बचत गटांना देण्यात येणाऱ्या लोखंडी स्टॉलच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्हे उभे ठाकले असून आयुक्त मनिषा आव्हाळे या स्टॉलच्या क्षमतेची पाहणी करणार असल्याचे बोलले जाते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button