महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यराजकीय

योद्धा न्यूज !! अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं अन् कराड-खोक्याभाई त्याची नियुक्ती करणार?, मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र व्हायरल

प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्यूज

आदरणीय मुख्यमंत्री साहेब,
माझ्या ११ वर्षाच्या मुलाने मला काल प्रश्न विचारला आप्पा मी मोठा झाल्यावर कलेक्टर होऊ का? किंवा त्यापेक्षा मोठा अधिकारी? त्याच्या या प्रश्नामुळे मीच बुचकळ्यात पडलो. कारण माझ्यासमोर बीडचं प्रकरण समोर आलं. वाल्मिक कराड, त्याचं टोळकं, धस, मुंडे, तो खोक्या भाई… अभ्यास करून पोराला IAS, IPS बनवायचं आणि असल्या फाल्तू लोकांची चाकरी करायला लावायची?
आम्ही नोकरदार माणसं आहोत. आमच्या आई-वडिलांनीही इमाने-इतबारे नोकरीच केली.

आजही रिक्षाने प्रवास करायचं म्हटलं तर आम्ही आधी खिसा चाचपडतो. ITR लेट झाला तर छाती धडधडते. मग या खोक्याभाई सारखी मंडळी हेलिकाॅप्टरमधून कशी फिरतात हो? पैशांच्या गड्ड्या उडवतात. आयकर विभाग तेव्हा झोपा काढतं का? की आयकर विभागाला फक्त नोकरदारांवरच लक्ष ठेवायला सांगीतलंय? आणि असले खोक्या भाई भाजपचे पदाधीकारी? त्यांचे ‘आका’ भाजपचे आमदार?

अहो एक सुसंस्कृत पक्ष म्हणून भाजपची ओळख होती. मनोहर पर्रिकर, नितीन गडकरी, अरुण जेटली, सुषमा स्वराज, स्वतः तुम्ही आमच्या पिढीचे आयकाॅन आहात. मग तरिही पक्षाची अशी अवस्था का? मुख्यमंत्रीसाहेब अहो साध्या खासगी कंपनीत नोकरी करायला आमच्याकडे कॅरेक्टर सर्टिफिकेट मागितलं जातं हो… आणि भाजप अशा खोक्याभाईंना पदाधिकारी करते? प्रत्येक गावात भाजपमध्ये असले अनेक खोक्याभाई आहेत. एकदा तुम्हीच गावपातळीपासून तपास करा.

निवडणुका, सत्तासंघर्ष हे पूर्वीही होते आजही आहेत आणि यापुढेही सुरुच राहील. सत्ता, सरकार ही नेत्यांसाठी की सामान्यांसाठी? पैसे कमवण्याची ऐशोआरामाचीही एक सीमा असते. आजही तहसील, तलाठी, DLR, TLRकार्यालय यातलं एकही काम तिथले कर्मचारी पैसे घेतल्यशिवाय करत नाहीत. विकासकामं चांगल्याप्रतिची होत नाहीत. शिक्षण संस्था, रुग्णालयं हे लुटमारीचे धंदे झालेत.

वर्षभर मान मोडून मुलं बोर्डाच्या परीक्षेच्या अभ्यास करतात आणि परीक्षेत पेपर फुटतात. अशा वेळी या मुलांची मानसिकता कशी होत असेल? ही सगळी कसरत करत आम्ही मुलांना शिकवलं तर त्यांची नियुक्ती खोक्याभाई किंवा कराडसारखे भाई करणार का? आमची मुलं धस, मुंडे अशा आकांचे आदेश ऐकणार का? त्यामुळे आता माझ्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच द्या…

अमित गडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वरील पत्र लिहिलं आहे…..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button