योद्धा ब्रेकिंग न्यूज !! जुन्या वादातून सराईत गुन्हेगाराचा खून, होळीच्या सणाला गालबोट
प्रतिनिधी मोहन काळे नाशिक योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी नासिक दि.१३-०३-२०२५
नाशिक : शहरात होळीचा जल्लोष सुरू असतानाच अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खळबळजनक घटना घडली. शुभम पार्क येथील जोसेफ चर्चसमोर जुन्या वादातून सराईत गुन्हेगार सुमित देवरे (वय २२) याचा चॉपरने वार करून निर्घृण खून करण्यात आला.
या हल्ल्यात चार जण सामील असून, मुख्य आरोपी वैरागर फरार आहे.जुन्या भांडणाची कुरापत काढून सिडको येथे एका युवकावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला. सुमित देवरे (वय २२) याच्यावर अरुण वैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चोपरने वार करून त्याचा निघृण खून केला. ही घटना सिडकोतील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्चसमोर घडली.
सुमित देवरे हा सटाणा येथे शिक्षण घेत होता. तो गंगेश्वर, महाजन नगर येथे कुटुंबासोबत राहत होता. एकुलता एक असल्यामुळे त्याच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुमित आणि अरुण वैरागड हे पूर्वी चांगले मित्र होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. त्याच वादातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात समोर कले आहे.
घटनास्थळी तणाव, पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
होळीच्या दिवशी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी सुमित देवरेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढते? नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा रंगली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांकडून कडक कारवाईची मागणी केली जात आहे.