Uncategorized

योद्धा न्यूज !! एसटीलाच नाही ‘हाय सिक्युरिटी’ नंबर प्लेट

प्रतिनिधी हरीश चव्हाण नाशिक

महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल गाड्यांनाच एचएसआरपी नसल्याचे निदर्शनास

मुंबई : राज्य परिवहन (आरटीओ) विभागाने राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व गाड्यांना ३० एप्रिलपर्यंत हाय सिक्युरिटी रेजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक केले आहे. मात्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल गाड्यांनाच एचएसआरपी नसल्याचे निदर्शनास आले आहे.

जानेवारी महिन्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ठाण्यात १७स्वमालकीच्या एसटी बसेसचे लोकार्पण केले होते. त्यावेळी दर महिन्याला ३०० एसटी बस दाखल होणार असून राज्यभरातील सर्व आगारांना या बस मिळतील, अशी माहिती सरनाईक यांनी दिली होती.

महामंडळाच्या बसला नियम लागू नाही का?

नव्याने दाखल झालेल्या बसलाच एचएसआरपी नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे एकीकडे राज्यातील सामान्य वाहनधारकांना एचएसआरपीची सक्ती करताना सार्वजनिक वाहतूक उपक्रमातील एसटी महामंडळाला हा नियम लागू होत नाही का? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे.

एसटीच्या बसबद्दल माझ्याकडे २ दिवसांपूर्वीच माहिती आली आहे. खरे तर असे व्हायला नको होते. याबाबतची सविस्तर माहिती घेऊन लवकरच कारवाई करण्यात येईल- विवेक भिमनवार, राज्य परिवहन आयुक्त

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button