नाशिक शहर न्यूजमहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यमाहिती तंत्रज्ञानराजकीयसामाजिक
Trending

योद्धा न्यूज !! (HSRP) एचएसआरपी नंबरसाठी शुल्क नाही तर जिझिया कर

प्रतिनिधी हरीष चव्हाण नासिक योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी नाशिक :- एचएसआरपी नंबरसाठी शुल्क नाही तर जिझिया कर भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेची लूट करण्याची एकही संधी सोडत नसून जानता आधीच महागाईने त्रस्त असताना आता वाहनधारकांच्या खिशावर सरकारची नजर पडली आहे.

वाहनांच्या हाय सेक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारले जात असून ते शुल्क नसून एक प्रकारे जिझिया कर आकारत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. या उपक्रमाचा हेतू चांगला वाटत असला तरी या आडून राज्यातील वाहनधारकांची अक्षरश: लूट सुरु आहे.

महाराष्ट्र सरकारने या नंबर प्लेटसाठी आकारलेले शुल्क हे इतर राज्यातील शुल्काच्या तुलनेत दुप्पट, तिप्पट आहे. शेजारच्या गोवा राज्यात दुचाकींसाठी १५५ रुपये आकारले जातात तर महाराष्ट्रात हाच दर ४५० रुपये आहे.

तीनचाकी वाहनांसाठी गोव्यात १५५ रुपये तर महाराष्ट्रात ५०० रुपये तर चारचाकी वाहनांसाठी गोव्यात २०३ रुपये आणि महाराष्ट्रात ७४५ रुपये आकारले जातात.

आंध्र प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब राज्यातही महाराष्ट्रापेक्षा कमी दर आकारले जातात. मग महाराष्ट्रातच हे दर दुप्पट वा तिप्पट आकारण्याचे कारण काय? या नंबर प्लेटसाठी १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे पण ही बाब आरटीओंनी लपवली आहे, हा भुर्दंड ही वाहनधारकाच्या माथीच लादलेला आहे.
जनतेला त्रास देणे थांबवा


ही नंबर प्लेट ३१ मार्चनंतर वाहनावर नसल्यास ५ हजार रुपये दंड आकारला जाणार आहे, दंडाची ही रक्कमही जास्त आहे.

कोणताही नवीन बदल करताना जनतेला नाहक त्रास होणार नाही याचा विचार केला पाहिजे पण या प्रकरणात तसे होताना दिसत नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी या पत्रात केली आहे.

🩺 हेल्थ मंत्रा | आरोग्य मंत्र |🩺

हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असण्याची लक्षणं शरीरात दिसतात, दुर्लक्ष केलं तर जीवावर बेतेल..

आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत आणि त्यांची कामेही वेगवेगळी असतात. शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव हृदय मानलं जातं. कारण ते बंद पडलं जीव जातो. हृदयाद्वारे ऑक्सीजन आणि रक्त शरीराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं. त्यामुळे हृदय निरोगी राहणं फार महत्वाचं असतं. पण आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हृदयात ब्लॉकेज होण्याची समस्या खूप वाढत चालली आहे. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज होण्याला कोरोनरी आर्टरी डिजीज असं (Coronary Artery Disease) म्हटलं जातं. याची काही लक्षणं शरीरात दिसतात जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही वेळीच सावध होऊन योग्य ते उपचार कराल.

हृदयात ब्लॉकेजची लक्षणं

मळमळ आणि अपचन

डॉक्टरांनुसार, जर छातीत वेदनेसोबत पुन्हा पुन्हा उलटी झाल्यासारखं वाटत असेल किंवा पचन तंत्र बिघडलं असेल तर हा हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेजचा संकेत असू शकतो. हे लक्षण दिसलं तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ते उपचार करा.

पायांमध्ये वेदना आणि सूज

जर पायांमध्ये वेदना आणि सूज दिसत असेल तर हा सुद्धा हृदयामध्ये ब्लॉकेज असण्याचा संकेत असू शकतो. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीराच्या खालच्या भागात तरल पदार्थ जमा होतात. त्यामुळे गुडघे आणि शरीराच्या खालच्या भागात वेदना होतात आणि सूज येते.

थकवा आणि चक्कर येणे

तुम्हाला जर पुन्हा पुन्हा चक्कर येत असेल आणि काही न करता खूप थकवा जाणवत असेल तर हे हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजचं लक्षण असू शकतं. अशावेळी हृदयाला ब्लड पंप करण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे चक्कर येतात आणि थकवा जाणवतो.

श्वास घेण्यास समस्या

एखादं हलकं काम केलं किंवा थोडंही चाललं तरी श्वास घेण्यास समस्या होत असेल तर ही काळजी करण्याची बाब आहे. हा नसांमध्ये ब्लॉकेज असण्याचा संकेत असू शकतो. हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीराला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही, ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते.

छातीत वेदना

हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असेल तर छातीत वेदना होणं हे सगळ्यात मोठं लक्षण आहे. जर तुम्हाला असं काही जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांना दाखवा.

योद्धा न्यूज !! पोस्कोची तक्रार न घेता सव्वा लाखाची वसूली; एपीआयसह शिपाई निलंबित अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button