धुळे जिल्हामहाराष्ट्र राज्यराजकीयसामाजिक

योद्धा न्यूज !! जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं

प्रतिनिधी योगेश कोळी योद्धा एक्सप्रेस न्यूज

पाकिस्तानमध्ये गेलेले जवान चंदू चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार विरोधात लढा देत आहेत. चंदू चव्हाण यांना सेवेमधून बडतर्फ करण्यात आले आहे.

धुळे : पाकिस्तानमध्ये गेलेल्या जवान चंदू चव्हाण यांची न्यायाच्या मागणीसाठी गेल्या 6 महिन्यांपासून लढाई सुरू असून आता त्यांनी थेट पाकिस्तान सरकारलाच मानवतेच्या भावनेतून मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केलीय. विशेष म्हणजे चंदू चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईतील मंत्रालय परिसरात आपल्या पत्नी व चिमुकल्या मुलासह येऊन भीक मागो आंदोलन केले होते. त्यानंतर, आज पुन्हा एकदा त्यांनी धुळे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून आपल्या मागण्यांची पूर्तता करण्याची विनंती केली आहे. तसेच, आतापर्यंत मी केलेल्या पत्र व्यवहाराचे उत्तर मला मिळावे, अशी मागणी भारतीय सैन्य दलातून बडतर्फ केलेल्या चंदू चव्हाण यांची धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

भारत सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे, मानवतेसाठी पाकिस्तान आवाज उठवेल का? अशा आशयाचे ट्वीट देखील चंदू चव्हाण यांनी केले आहे.
पाकिस्तानमध्ये गेलेले जवान चंदू चव्हाण हे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार विरोधात लढा देत आहेत. चंदू चव्हाण यांना सेवेमधून बडतर्फ करण्यात आले असून आपल्याला सेवेमधून का बडतर्फ करण्यात आले, असा प्रश्न विचारत ते अनेक आंदोलन करीत आहे. विशेष म्हणजे मला बडतर्फ करताना संविधानाची पायमल्ली झाली असून माझ्यावर अन्याय करण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी देखील माझ्याकडील सर्व गॅझेट पाहून संरक्षणमंत्र्यांशी पत्र व्यवहार केला. मात्र, अद्यापही माझ्या मागण्यांची पूर्तता करण्यात आली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी यापूर्वीच केली, गेल्या अकरा वर्षांपासून त्यांचा हा लढा सुरू आहे.

पाकिस्तान सरकारकडे न्यायाची मागणी

भारतीय सैन्य दलातून मला कशा पद्धतीने अन्याय करून असंविधानिक पद्धतीने बडतर्फ करण्यात आले. मला बडतर्फ करताना भारतीय संविधानाची पायमल्ली केल्याचे जवान चंदू चव्हाण यांनी सांगितले आहे. धुळे लोकसभेच्या खासदार शोभा बच्छाव यांनी देखील माझी सर्व कागदपत्र बघितले असून त्यांनीच रक्षा मंत्रालय यांच्याशी पत्र व्यवहार केले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना देखील खासदार शोभा बच्छाव यांनी पत्र व्यवहार केल्याची माहिती चंदू चव्हाण यांनी दिली. तसेच, जर भारत सरकार मला न्याय देत नसेल तर मानवतेच्या भावनेतून पाकिस्तान सरकारने मला न्याय द्यावा, असे खळबळजनक ट्विट जवान चंदू चव्हाण यांनी केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button