कर्नाटकराजकीयसामाजिक

योद्धा न्यूज !! कर्नाटकी नाटक सुरूच ! महाराष्ट्र राज्याच्या बस चालक, वाहकाच्या तोंडाला कलबुर्गी शहरात काळे फासले

प्रतिनिधी किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

प्रतिनिधी कोल्हापूर:- कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासल्याच्या प्रकार कांही केल्या कमी होत नाही. शनिवारी (ता. एक) कलबुर्गी शहरातील रिंग रोडला कर्नाटका रचना वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बस थांबवुन चालक, वाहकाला काळे फासले. शिवाय बस वर काळ्या, पिवळ्या व लाल रंगाने, कन्नड भाषेत ‘जय कर्नाटका’ लिहित निषेध व्यक्त केला.

उमरगा तालुका हा एक सीमावर्ती भागात असल्याने, येथे मराठवाड्यातुन नांदेड, छत्रपती नगर, भोकर, जालना, निलंगा, लातूर आगाराच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस जातात. कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेसच्या फेऱ्या महाराष्ट्रात असतात. मात्र गेल्या आठ, दहा वर्षापासुन बस चालकांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रकार सुरु आहे.

मध्यंतरी कर्नाटक राज्याच्या आळंद – पुणे बसच्या चालकाला स्वारगेट येथे काळे फासण्याचा प्रकार झाला होता. तेवढ्या एका प्रकाराने कर्नाटकातील या संघटनेने महाराष्ट्र राज्याच्या बसेस अडवून घोषणाबाजी करण्याचा प्रकार सुरूच आहे. यामागे महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद की, भाषा वाद आहे, याचा उलगड बसचालकांनाही होत नाही.

दरम्यान शनिवारी (ता. एक) सायंकाळी पावणे पाच वाजता नांदेड आगाराची बस (क्र एम एच २० बी एल २२२४) कलबुर्गी बस स्थानकातून निघाल्यानंतर रिंग रोडला एका संघटनेच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांनी बस अडविली. जय कर्नाटकाच्या घोषणा करत चालक नामदेव रामराव पपुले व वाहक संदिप ग्यानोबा किरवले यांना काळे फासले.

बसवर झेंडे लावले. बसच्या नंबर प्लेटवर काळे डांबर लावले, शिवाय कन्नड भाषेत ‘जय कर्नाटका’ लिहित निषेध व्यक्त केला. या प्रकाराने भयभित झालेल्या चालक, वाहकाने रस्त्यात असलेल्या आळंद बसस्थानकातील चौकशी विभागाला माहिती सांगितली, परंतु त्यांनीही या प्रकाराला गांभिर्याने घेतले नाही.

सायंकाळी सात वाजता चालक, वाहक यांनी उमरगा बसस्थानकात आल्यानंतर अधिकाऱ्यांना हा प्रकार सांगितला. या घटनेसंदर्भात चालक श्री. पपुले यांनी स्थानकप्रमुख श्री. सरवदे यांना लेखी माहिती दिली आहे.

‘अचानक कार्यकर्त्यांनी बस अडवुन आम्हा चालक, वाहकाला रंगविले. जोरदार घोषणाबाजी करत अंगावर येण्याचा प्रकार सुरू होता. बसवर ठिकठिकाणी कानडी भाषेत लिखान केले. बसमध्ये ५४ प्रवाशी होते. झालेल्या प्रकाराने आम्ही घाबरलो होतो. हा प्रकार नेमका कोणत्या कारणाने सुरू आहे याची कल्पना नाही, मात्र चालकांची मानसिकता बिघडते.

– नामदेव पपुले, चालक नांदेड आगार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button