अहिल्यानगर जिल्हामहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यमहिला विशेष

योद्धा न्यूज !! महिला दिनी युवा महिला पत्रकार रक्षंदा स्वामी यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

प्रतिनिधी :- नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

महिला दिनी युवा महिला पत्रकार रक्षंदा स्वामी यांना पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या आठ वर्षापासून पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या संदर्भात वेगवेगळे स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असून ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी विमा योजना घरकुल योजना आरोग्य योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांबाबत स्वतंत्र सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता राज्यातील वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा 20 हजार रुपये पेन्शन यासह राज्यातील पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाणबाबत पत्रकार सुरक्षा समिती नेहमीच आक्रमक भूमिका घेऊन राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच बरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीनां पत्रकार सुरक्षा समिती वतीने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा म्हणून दरवर्षी विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार केला जातोय

पत्रकार सुरक्षा समिती चा राज्यस्तरीय पुरस्कार 2025 चा आदर्श महिला पत्रकार म्हणून जनदर्पण न्यूज चॅनलच्या महिला पत्रकार रक्षंदा स्वामी यांना जाहीर केल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे व सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी यांनी माहिती दिली आहे

महिला पत्रकार रक्षंदा स्वामी यांचा अल्प परिचय

महिला पत्रकार रक्षंदा स्वामी यांना पूर्वीपासूनच पत्रकारितेचे आवड असल्याने त्याचबरोबर समाजातील तळागाळांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेने रक्षंदा स्वामी या पत्रकारिता क्षेत्रांमध्ये आल्या असून गेल्या चार ते पाच वर्षापासून त्या जनदर्पण न्यूज चॅनल च्या अँकरिंग व एडिटर म्हणून काम पहात असून कुटुंब सांभाळून एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये अतिशय उत्कृष्टपणे काम करत असून समाजाचा आरसा म्हणून सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्या जनतर्पण न्यूज चैनल च्या माध्यमातून प्रशासन दरबारात मांडत असून एक आक्रमक महिला पत्रकार म्हणून सोलापूर शहर जिल्ह्यात त्यांची ओळख आहे

महिलादिनी रक्षंदा स्वामी यांना पत्रकार सुरक्षा समितीचा 2025 चा राज्यस्तरीय आदर्श महिला पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याने महिला पत्रकार रक्षंदा स्वामी यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button