योद्धा न्यूज !! नाशिक लेखानगर -राजीव नगर दिशादर्शक फलकावरील औरंगाबाद नाव हटवा
भारतीय जनता पार्टी भटकी विमुक्तनाशिक महानगर उपाध्यक्ष श्री शरद अण्णा जाधव

’नाशिक : प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्युज
औरंगाबाद शहराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाले असूनही मात्र अद्यापही अनेक ठिकाणच्या दिशादर्शक कमानीवर छत्रपती संभाजीनगरऐवजी औरंगाबाद हेच नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी भारतीय जनता पार्टी भटकी विमुक्तनाशिक महानगर उपाध्यक्ष श्री शरद अण्णा जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने जर नावात बदल केला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
नाशिक- मुंबई आग्रा रोड हायवे लेखानगर इंदिरानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर महामार्ग जातो. वाहनधारकांना दिशा कळावी याकरिता शहरातील विविध ठिकाणच्या मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशादर्शक कमानी
लावल्या आहेत. मात्र, या दिशादर्शक कमानीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसते. कारण या कमानीवर अद्यापही औरंगाबाद हेच नाव ठेवण्यात आले आहे. यावरून नागरिकांकडून वारंवार नाराजी
व्यक्त केली जाते, असे असूनही सा. बांधकाम विभागाने या दिशादर्शक कमानीवरून औरंगाबाद नाव हटवून छत्रपती संभाजीनगर केलेले पाहिजे. अशी मागणी स्थानीय रहिवाशांकडून होत आहे.
भारतीय जनता पार्टी भटकी विमुक्तनाशिक महानगर उपाध्यक्ष श्री शरद अण्णा जाधव
राज्यासह देशभरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या छावा चित्रपटाची घूम पहायला मिळत आहे. अब्रालांपासून ते वृद्धापर्यंत चित्रपट पाहताना त्यांचे डोळे पाणावत आहे.
जेजुरी:- महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी आजपासून (दि. १०) वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे. यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष व महिला भाविकांना मंदिरांत कमी कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे. फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा व तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे.
याविषयी बोलताना श्री मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते म्हणाले की, “मंदिराची पावित्र्य, शालीनता जपणारी वेशभूषा भाविकांकडून अपेक्षित आहे. गुडघ्याच्या वरती असणारे किंवा आखूड- कमी कपडे अपेक्षित नाहीत. असे कपडे न घालण्याचं नम्र आवाहन सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीने भाविकांना करण्यात आले आहे. महिला आणि पुरुष दोघांसाठी हे नियम सारखेच असणार आहेत. दरम्यान दर्शनासाठी येताना भाविकांनी कोणत्याही प्रकारचे भारतीय पारंपरिक वेशभूषा केलेली चालणार आहे.