योद्धा न्यूज !! पेडगाव ता श्रीगोंदा येथील ऐतिहासिक बहादूरगडाच्या विकासासाठी निधीसंदर्भात मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन देताना श्रीगोंदा व नगर विधानसभा मतदार संघाचे कार्यक्षम आमदार श्री विक्रमजी बबनराव पाचपुते
प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाचे प्रतिक असणाऱ्या पेडगाव ता श्रीगोंदा येथील ऐतिहासिक बहादूरगडाच्या सर्वांगीण विकासासाठी २०० कोटी रुपये निधी मंजूर करण्याबाबत निवेदन आमदार श्री विक्रमजी पाचपुते यांनी सादर केले. यामध्ये विविध प्रस्तावित विकास कामांचा समावेश असून, किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासोबतच पर्यटन वाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा प्रस्ताव आमदार साहेब यांनी मांडला. यावेळी या प्रस्तावित विकास कामांसाठी निधीची मागणी केली.
1. ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन (गडावरील बुरुज, प्रवेशद्वार, भवानी माता मंदिर, देवटाके, टिळक बंगला इ.)
2. गडाची तटबंदी दुरुस्ती व मजबुतीकरण
3. गडावरील पिण्याच्या पाण्याची टाकी दुरुस्ती व नवीन पाण्याचा स्रोत निर्माण
4. सांडपाणी व्यवस्थापन व स्वच्छता व्यवस्था उभारणी
5. नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन व जलपुनर्भरण योजना
6. सौर ऊर्जा प्रणालीद्वारे विद्युत व्यवस्था उभारणी
7. गडावर येणाऱ्या पर्यटक वाहनतळ (Parking) व्यवस्था व ई-बस सेवा सुविधा
8. गडावर जाणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती व निसर्गपूरक मार्गदर्शक फलक लावणे
9. आपत्ती व्यवस्थापनासाठी अग्निशामक व आरोग्य केंद्र सुविधा उपलब्ध करून देणे
आमदार पाचपुते साहेब म्हणाले मला विश्वास आहे की, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस या मागण्यांकडे लक्ष देऊन आपल्या श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना प्राधान्य देतील….