योद्धा न्यूज !! पत्रकार सुरक्षा समिती धाराशिव जिल्हा अध्यक्ष (महिला विभाग ) पदी सारिका चुंगे
प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर
सोलापूर- पत्रकार सुरक्षा समिती वतीने गेल्या आठ वर्षापासून जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती राज्यातील youtube व पोर्टल ला शासकीय मान्यता खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत चौकशी अधिस्वीकृती पत्रिका मधील शिक्षणाची अट आठवी पास करणे यादीवर पत्रकारावर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याचबरोबर राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती वतीने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्य सरकारकडे पत्र व्यवहार करून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
महिला पत्रकार सारिका चुंगे यांचा अल्प परिचय🥉
सारिका चुंगे या मूर्टा ता तुळजापूर येथील रहिवाशी असून त्या सुवर्ण युग वृत्त पत्राचे गेली अनेक वर्षांपासून धाराशिव जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पहात असून समाजातील वंचित पिढीत घटका च्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणी च्या माध्यमातून तळागाळातील लोकांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त त्याच बरोबर शोषित व दुर्बलांच्या मदतीला त्या नेहमीच धावून जातात
त्यांच्या धडाकेबाज पत्रकारितेची पत्रकार सुरक्षा समिती ने दखल घेऊन सारिका चुंगे यांना धाराशिव जिल्हा अध्यक्ष (महिला विभाग) पदी नियुक्ती केली असून महिला पत्रकार सारिका चुंगे यांना पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे प्रदेश संघटक गणेश जाधव प्रदेश उपाध्यक्ष किरण बाथम पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद भैस कार्याध्यक्ष तानाजी माने संघटक मिरझा गालिब मुजावर मराठवाडा विभाग अध्यक्ष बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष प्रवीण राठोड सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्रीकृष्ण देशपांडे परभणी जिल्हा अध्यक्ष प्रसाद पौळ रायगड नवी मुंबई अध्यक्ष राज भंडारी अहिल्यानगर अध्यक्ष नंदकुमार बगाडे पाटील धाराशिव जिल्हा अध्यक्ष राहुल कोळी सातारा जिल्हा अध्यक्ष विक्रम वाघमारे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.