योद्धा न्यूज !! शहिद मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या जयंती निमित्त शहर भाजपाच्या वतीने अभिवादन
प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

प्रतिनिधी अहिल्यानगर :- अहिल्या नगर: २००८ साली मुंबई मध्ये 26 /11 रोजी झालेल्या दहशतवादी अतिरेकी हल्ल्यात लढुन देशासाठी शहिद झालेले शहिद मेजर संदिप उन्नीकृष्णन यांच्या जयंती निमित्त अहिल्यानगर येथील रामवाडी येथे “भारतीय जनता पार्टी” शहरजिल्हा अनु.जा.मोर्चाच्या वतीने शहीद मेजर उन्नीकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करुन मानवंदना देण्यात आली. यावेळी मोर्चाच्या शहराध्यक्षा मिराताई सरोदे व शहर चिटणीस सुनिल सकट आदींसह महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई मध्ये 26 /11/2008 रोजी झालेल्या दहशतवादी अतिरेकी हल्ला झाला.यावेळी अतिरेक्यांशी लढुन देशासाठी शहिद झालेले शहिद मेजर संदिप उन्नीकृष्णन यांना मरणोपरांत “अशोकचक्र” या मानाच्या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.मेजर उन्नीकृष्णन यांचे बलीदान देशासाठी अजरामर व प्रेरणादायी आहे.त्यांचे बलीदान देश कदापी विसरणार नाही. असे प्रतीपादन सुनिल सकट यांनी केले.
लेखक,शाहिर शंकर भाऊ साठे स्मृतीदिनी अभिवादन…
अ.नगर/प्रतिनीधी:”भारतीय लहुजी सेनेच्या” वतीने अहिल्यानगर,रामवाडी येथे मातंग समाजाचे लेखक,शाहिर स्व.शंकर भाऊ साठे यांच्या स्मृतीदिना निमीत्त अभिवादन करण्यात आले. देशाचे विश्वविख्यात साहित्यीक साहित्यरत्न लोकशाहिर डॉ.अण्णा भाऊ साठे यांचे धाकटे बंधु स्व.शंकर भाऊ साठे यांना १५ मार्च स्मृतीदिना निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
महिला जिल्हाध्यक्षा मिराताई सरोदे व युवाजिल्हाध्यक्ष सुनिल सकट यांनी त्यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. शाहिर शंकर भाऊ साठे यांनी १५ कांदबर-या लिहील्या असुन त्यातल्या १२ प्रसिद्ध झाल्या आहेत ते लोकप्रबोधन करुन शाहिरी गात असत. ते जिवणाच्या रणांगणावर लढणारे लेखक होते. त्यांच्या अभिवादन समयी मानवी हक्क अभियानचे शहराध्यक्ष अशोक भोसले,दत्ता जाधव महिला भगिनी, आदी कार्यकर्ते उपस्थीत होते