योद्धा न्यूज !! शिर्डी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रतिनिधी नंदकुमार बगाडे पाटील अहिल्यानगर

आज शिर्डी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी खासदार श्री भाऊसाहेब वाकचौरे साहेब, श्री रोहित भाऊसाहेब वाकचौरे,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.शिरीष वमने, शिर्डी शहर पोलिस निरीक्षक श्री.गलांडे, श्री संजू अप्पा शिंदे व सर्व शिवसेना पदाधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे ध्येय, पराक्रमी प्रशासन आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेची दूरदृष्टी ही आजही मार्गदर्शक आहे.
यावेळी शिवनेरीपासून सुरू केलेल्या गडकोट आणि दुर्गसंवर्धन अभियानासंदर्भात चर्चा झाली. आपल्या छत्रपतींच्या गडकोटांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर व्यापक चर्चा करत गडसंवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प करण्यात आला.
शिवरायांचे तेज, पराक्रम आणि न्यायनिष्ठ नेतृत्व आम्हाला प्रेरित करत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
जय जिजाऊ! जय शिवराय!