योद्धा न्यूज !! सरपंच संतोष देशमुख खुनातील आरोपी कृष्णा आंधळे नाशिक शहरात असल्याची माहिती, पोलिसांची शोधाशोध
योद्धा एक्सप्रेस न्युज नासिक

नाशिक : आत्ताची सगळ्यात मोठी बातमी..सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी नाशिक मध्ये दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.कृष्णा आंधळे याला बापू पुल येथील एका कॅफे मध्ये पकडले असल्याची माहिती सूत्रांनीं दिली आहे.ह्याची माहिती समजताच पोलिसांचे पथक तातडीने सहदेव नगर परिसरात दाखल झाले होते.बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे तीन महिन्यांपासून फरार आहे. कृष्णा आंधळे याला शोधण्यासाठी संपूर्ण पोलीस प्रशासन कार्यरत असताना देखील कृष्णा आंधळे याचा शोध घेता आलेला नाही. अशातच आता कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. तीन महिने पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचं समोर आलं आहे. त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यावर प्रत्यक्षदर्शी वकिलाने मोठा खुलासा केला आहे. कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस देखील जाहीर केलं होतं. त्यानंतर आता कृष्णा आंधळे याची पहिली हिंट मिळाली आहे.
दरम्यान नागरिकांनी हाटकल्यानंतर कृष्णा आंधळे दुचाकीवरून फरार झाल्याच समजतंय.तर तो मखमलाबादच्या दिशेने गेल्याचा यावेळी स्थानिकांनी सांगितलं.त्यामुळे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.तसेच नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.