योद्धा न्युज!! भंडाऱ्याचा श्वास मोकळा..भंडारा बायपास मार्गावर सुरू झाली एकेरी वाहतूक माजी खा. सुनिल मेंढेंनी घेतला पुढाकार.
प्रतिनिधी भंडारा प्रशांत पेंढेकर योद्धा एक्सप्रेस न्युज

प्रतिनिधी भंडारा योद्धा एक्सप्रेस न्युज
भंडारा: वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि भंडारेकरांना होणारा मनस्ताप, अपघातात जाणारे जीव पाहून अस्वस्थ झालेल्या माजी खासदार सुनील मेंढे यांच्या पुढाकारात आज अखेर भंडारा शहरा बाहेरून जाणारा भंडारा बायपास मार्ग आंदोलन करून वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. बायपास मार्गाची एक मार्गीका सुरू केली गेली असून रायपूर कडून नागपूरकडे जाणारी जड वाहतूक आता या मार्गाने सुरू झाल्याने भंडाऱ्याने मोकळा श्वास घेतला आहे.
भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतुकीची अडचण आणि वाढता ताण लक्षात घेता तत्कालीन खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडून भंडारा बायपास मार्ग मंजूर करून आणला. दि. 3 मार्च 2022 मध्ये भूमिपूजन झाले होते. चार वर्षे होऊनही काम पूर्ण न झाल्याने वारंवार कंत्राटदार कंपनी सोबत चर्चा केली गेली.
आज उद्या अशी तारीख देऊन बायपास मार्गाची एक मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन दिले जात होते. मात्र दुसरीकडे भंडारा शहरात प्रचंड वाहतूक कोंडीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यातच होणाऱ्या अपघातांमुळे काहींना जीवही गमवावा लागला. दरम्यान लोकांची होणारी असुविधा आणि वाहतुक कोंडीचा मनस्ताप पाहून आज अखेर माजी खासदार सुनील मेंढे यांनी पुढाकार घेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत जाऊन वाहतुकीसाठी तयार असलेली बायपास मार्गाची एक मार्गिका सुरू केली.
यावेळी लहान-मोठे अडथळे दूर करण्यात आले. रायपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या जड वाहनांना भिलेवाडा येथून या बायपास मार्गावर सोडण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. वाहतूक बायपास मार्गावर वळल्याने शहरातून जाणाऱ्या ट्रकची गर्दी अचानक कमी झाल्याने भंडारा शहराने मोकळा श्वास घेतला. तर जड वाहतूक करणाऱ्या चालकांच्या चेहऱ्यावरही कोंडीतून सुटल्याचे समाधान दिसून येत होते.
यावेळी खा. सुनील मेंढे यांच्यासोबत डॉ.उल्हास फडके, शिवराम गिर्हेपुंजे, जि.प. सदस्य अविनाश ब्राम्हणकर, विनोद बांते, प.स. सदस्य प्रशांत खोब्रागडे, जिल्हा महामंत्री मयूर बिसेन, शहर अध्यक्ष सचिन कुंभलकर, रोशन काटेखाये, मंगेश वंजारी, रोशन काटेखाये, राजेश वाघमारे, क्रिष्णा उपरीकर, प्रशांत निंबोळकर, प्रमोद धार्मिक, रौनक उजवणे, अविनाश ब्राम्हणकर, गोवर्धन साकुरे, सचिन तिरपुडे, मुन्ना नागोरी, प्रमोद वावधने, सुर्यकांत इलमे, अरुण कारमोरे, शिव आजबले, शैलेष मेश्राम, चितेश मेहर, शशी राजूरकर, सौ. मंजिरी पनवेलकर, माला बगमारे, कल्पना कुर्झेकर, चंद्रकला भोपे, वनिता कुथे, रोशनी पडोळे, जया हिंगे, माधुरी तुमाने, श्रद्धा डोंगरे, स्नेहा श्रावणकर, वर्षा साकुरे, जया मेहर, मंगला हटवार व आदी उपस्थित होते.
चौकट
उद्घाटन नितीनजीच करणार: मेंढे
नितीनजींच्या पुढाकाराने हा बायपास मार्ग पूर्णत्वास गेला. मात्र संथ गतीने काम सुरू असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी आणि प्रसंगी अपघाताला लोकांना सामोरे जावे लागत आहे. वारंवार सूचना देऊनही विकासकाकडून एक मार्गी का सुरू केली जात नव्हती. लोकांचा रोष आणि गरज लक्षात घेता आज आम्ही रायपुर कडून नागपूरकडे जाणारी वाहतूक बायपास मार्गाने वळवली आहे. मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर विधिवत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन करू असे मत माजी खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केले.