योध्दा न्यूज ब्रेकिंग – सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आले समोर; मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा…
प्रतिनिधी योद्धा एक्सप्रेस न्यूज नाशिक

योद्धा न्यूज : प्रतिनिधी
नाशिक : आता एक धक्कादायक घटना समोर अली आहे.राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर आज राजीनामा दिला आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणात, धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर, महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती.याप्रकरणावरुन प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीआयडी आणि एसआयटीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला होता. यामध्ये वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता. त्यामुळे सीआयडीने वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. नुकतेच याप्रकरणात 1500 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यामध्ये वाल्मिक कराड हाच त्या हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते.