नाशिक शहर न्यूजनासिक क्राईम रिपोर्टमहाराष्ट्र राज्य

योद्धा ब्रेकिंग न्यूज: अवघ्या एक रुपयाच्या सिगारेटच्या किंमतीवरून वाद; टपरी चालकाच्या मारहाणीत व्यक्तीचा मृत्यू

प्रतिनिधी हरिष चव्हाण नासिक

नाशिक : नवीन नाशिकमधील सिडको परिसरात सिगारेटच्या किंमतीवरून झालेल्या वादात टपरी चालकाने काठीने केलेल्या मारहाणीत एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजी स्टेडियमजवळ घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टेडियमच्या मागील बाजूस अपंग टपरी चालक बापू जगन्नाथ सोनवणे (वय 59, रा. शिवपुरी चौक, सिडको, नाशिक) यांची टपरी आहे. दुपारी 1.30 वाजता विशाल भालेराव हा व्यक्ती टपरीवर आला. दहा रुपयांच्या सिगारेटसाठी अकरा रुपये का घेतले? या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर टपरी चालकाने भालेराव यांना काठीने जोरदार मारहाण केली.

या मारहाणीत भालेराव यांच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अंबड पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश हांडे यांनी दिली. सदर घटनेतील दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button