महाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्य

योद्धा न्यूज!! सातारा जवान मदन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार उरण तळावर कर्तव्य बजावत असताना वीरमरण; कण्हेरखेडवर शोककळा

श्री किरण पाटील मामा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष योद्धा ग्रुप

कोरेगाव : मुंबई येथील भारतीय नौदलाच्या ब्रह्मपुत्र

करंजा उरण या तळावर नेमणुकीस असलेले रडार प्लॉटर मदन दत्ताजी जाधव (वय ३३, रा. कण्हेरखेड, ता. कोरेगाव) यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगी असा परिवार आहे. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी हवेत झाडून तर नौदलाच्यावतीने अधिकारी अमोल मलपे, एल. नायडू, उपाध्याय यांच्यासह ३४ जवान यांनी मानवंदना दिली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी अंत्यसंस्कार केले. भारतीय नौदलाचे उरण मुंबई येथील अधिकारी व जवान यावेळी उपस्थित होते.

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मदन जाधव यांनी शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतले. भारतीय नौदलामध्ये ते रुजू झाले. तेथे सेवा बजावत असताना त्यांना पदोन्नती मिळत गेली. सध्या ते उरण येथेलीडिंग सिमॅन रडार प्लॉटर या पदावर कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. कुटुंबातील सदस्यांनी त्यांना तात्काळ कुलाबा येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले, मात्र उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आल्याची माहिती समजताच कण्हेरखेडमध्ये शोककळा पसरली. मुंबई येथून पार्थिव दुपारी कण्हेरखेड येथे आल्यानंतर ते निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय चा जयघोष करण्यात आला.

जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, शिरंबेच्या मंडलाधिकारी माधवी देशमुख, ग्राममहसूल अधिकारी प्रशांत पवार,समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, रहिमतपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे, शिरंबेच्या मंडलाधिकारी माधवी देशमुख, ग्राममहसूल अधिकारी प्रशांत पवार, अॅड. विजयसिंह शिंदे, दुष्यंतराजे शिंदे, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या अॅड. दीपिका विजयसिंह शिंदे, सरपंच सारिका सुर्यवंशी, उपसरपंच अजित पवार, समीर शिंदे, संजय शिंदे सरकार, विकास सोसायटीचे चेअरमन केशव शिंदे, व्हाईस चेअरमन दिलीप वाघमारे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button