योद्धा एक्सप्रेस न्युज!!एक_हात_मदतीचा आम्ही_कोल्हापूरी_मदतीला_जगात_भारी
किरण पाटील मामा प्रतिनिधी योद्धा हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश

योद्धा एक्सप्रेस न्यूज कोल्हापूर
YVCM Helping Foundation (NGO) संचालित योद्धा वाहन चालक मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र भारत
संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ नासिक
किरण पाटील प्रतिनिधी :– गणेश कापशीकर रा. शाहूपुरी, कोल्हापूर वय 35 वर्ष, इलेक्ट्रिक काम करणारा उमदा तरुण, पण कमी वयातच शुगरचा प्रचंड त्रास सुरू झाला, तो ही इतका की भरपूर इन्सुलिन सुरू करावे लागले. चांगला धिपाड शरीरयष्टी असणारा गणेश हळू हळू कमजोर व्हायला लागला,
घरची परिस्थिती त्याच्यावरच अवलंबून,घरात ( वयस्कर आई, बहीण व तिची मुले ) यांची जबाबदारी संपूर्ण गणेश वरच.. याच चिंतेत त्याची तब्येत अजूनच खालवायला लागली. आजारपणामुळे हातातील कामे सुटायला लागलीत आणि मिळाली होती ती कामे करण्याकरिता त्याला शरीरही साथ देईना. शरीराला जास्त त्रास होवू नये याकरिता त्याने शाहूपुरीत इडली नाश्ता गाडी सुरू केली, जिथे त्याची आई, बहीण सुध्दा मदत करू लागल्या, हे सुरू करून काही दिवस होतात तोपर्यंत गणेशच्या शूगरचा त्रास पुन्हा इतका वाढला की, त्याचा उजव्या पायाचा अंगठा काढावा लागला. एका खाजगी हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन झाले, पण त्याचे बिल भरायला आणि औषधांसाठीही गणेशकडे पैसे नव्हते. त्याच्या काही मित्रांनी मिळून त्यावेळी मदत केली, पण इथूनच पुढे गणेशची खरी कसोटी सुरू झाली. इथून पुढे घर चालवायचे कसे, कारण 3 ते 4 महिने घरातच राहावे लागणार आणि पुढे घरची जबाबदारी पेलणारा हाच गणेश….
वाईट वेळ सुध्दा गणेशचा पाठलाग करतेय की काय असंच वाटावं, इतके वाईट प्रसंग त्याच्या आयुष्यात एकानंतर एक येतायत. ऑपरेशन नंतर सारं काही ठीक होईल असे वाटत असतानाच, पुन्हा त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याचे ऑपरेशन केले होते तिथे गँगरीन झाले. पूर्ण उजव्या पायाच्या तळव्या सहित ते गॅंगरीन पसरले. पुन्हा खाजगी हॉस्पिटलमध्ये गेला असता पुढील आर्थिक खर्च न पेलवणारा असल्याने सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये त्याला नेले, तिथे ऑपरेशन तर मोफत होईल पण औषधे बाहेरून आणावी लागतात…

आणि अजून ३ ते ४ महिने गणेश बेडवरून उठूही शकणार नाही.
प्रत्येक गरीब गरजूसाठी नेहमीच दातृत्वाचा हात पुढे करणाऱ्या कोल्हापुरकरांना माझी विनंती आहे की आपण आपल्या कोल्हापुरी गणेश करिता, शक्य असेल त्या प्रकारे मदत करावी.
एक हात मदतीचा.
👇👇👇👇👇👇👇👇👇🙏