Breaking newsक्राईम न्यूजनागपूरमहाराष्ट्र राज्य

योद्धा एक्सप्रेस न्युज := नागपूर क्षुल्लक वादातून ट्रक चालकाची हत्या; कट मारल्याने दोन चालकांमध्ये वाद

प्रतिनिधी :-अनंता पुरी योद्धा एक्सप्रेस न्युज

नागपूर क्राईम न्यूज : क्षुल्लक वादातून ट्रक चालकाची हत्या; कट मारल्याने दोन चालकांमध्ये वाद

नागपूर न्यूज : नागपूरमध्ये दोन ट्रक चालकांमध्ये किरकोळ वादातून वाढलेल्या भांडणात अल्पवयीन क्लिनरने चाकूने वार करून एकाचालकाची हत्या केली. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. भारतीय सारथी  योद्धा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अनंतपुरी व अध्यक्ष संतोष चांदेकर यांनी मृत पावलेल्या अर्जुन डहारे याच्या आईची भेट घेऊन  पुढील कारवाईसाठी वकिलांशी चर्चा करून मृतक अर्जुन डहारे याच्या पश्चात असलेल्या आई व कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहे.

नागपूर : एका ट्रकला दुसऱ्या ट्रकची कट लागली. त्यातून

उफाळलेल्या वादातून अल्पवयीन ‘क्लिनर’ने चाकूने वार करीत, अन्य ट्रकचालकाचा खून केला. ही घटना जरीपटका हद्दीतील तथागत चौकात रविवारी (ता.२७) सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणात अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले.

वंश ऊर्फ अतुल अर्जुन डहारे (वय २१ रा, सोनबानगर, खडगाव रोड, वाडी) असे मृत ट्रकचालकाचे तर नीलेश सुरेश सहारे (वय २६, रा. बालाघाट, मध्यप्रदेश) असे आरोपीचा साथीदार असणाऱ्या ट्रकचालकाचे नाव आहे. दोन्ही ट्रकची एकमेकांना कट लागली. त्यातून वाद उद्भवला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button