कोल्हापूर जिल्हामहाराष्ट्र ग्रामीणमहाराष्ट्र राज्यसामाजिक

योद्धा न्यूज!!दहावीच्या आज १३ मे रोजी निकाल

प्रतिनिधी समीर सनदी महाराष्ट्र मेडिया अध्यक्ष

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीचा निकाल कधी लागणार याबाबत सर्वांना विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता होती. आता त्यांची ही उत्सुकता संपली आहे. दहावीच्या परीक्षाचा निकाल आज १३ मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षाचा निकाल जाहीर होणार आहे. आज १३ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने हा निकाल मिळणार आहे. निकालापूर्वी मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. त्यात निकालाची एकंदरीत माहिती दिली जाणार आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल २७ मे रोजी जाहीर झाला होता. यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षाही लवकर झाल्या. त्यामुळे बारावीचा निकालही लवकर लागला होता. आता दहावीचा निकालही लवकर जाहीर होत आहे.


10 वी निकाल चेक करण्याची वेबसाईट लिंक | Maharashtra Board 10th SSC Result 2025 Website Link

10th SSC Result Link Maharashtra 2025 – महाराष्ट्र स्टेट बोर्ड दहावीचा निकाल चेक करण्याचे लिंक कोणती. 10 वी चा निकाल 2025 कोणत्या लिंक वरून चेक करू शकता. याबद्दलची सर्व माहिती खाली देण्यात आले आहे. तुम्ही तुमचा महाराष्ट्र बोर्ड चा दहावी निकाल. कोणत्या लिंक वरून चेक करायचा व कसा चेक करायचा याची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने तुमचा निकाल मोबाईल मध्ये चेक करू शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button